'पुष्पा' फेम अभिनेता Allu Arjun कडून चाहत्यांसाठी 'गुडन्यूज'

अल्लू अर्जुनने महत्त्वाची घोषणा करताचं चाहत्यांचा उत्साह शिगेला  

Updated: Jul 18, 2022, 10:07 AM IST
'पुष्पा' फेम अभिनेता  Allu Arjun कडून चाहत्यांसाठी 'गुडन्यूज'

मुंबई : 'फ्लॉवर नाही फायर समझा क्या...', पुष्पा सिनेमातील अनेक डायलॉगने तरुणांपासून चिमुकल्यांना वेड लावलं. दाक्षिणात्य चित्रपटांना फक्त देशातच नव्हे, तर परदेशातही कमालीची लोकप्रियता आहे. अशा या चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकार म्हणजे जणू चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा त्यापैकीच एक. (Pushpa ) 'पुष्पा: द राइज' चित्रपटाला लोकप्रियता मिळाल्यानंतर तर, अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेनं शिखर गाठलं. जळीस्थळी काष्ठीपाषाणी त्याचंच नाव सर्वांच्या तोंडी होतं. 

दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवल्यानंतर अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मध्यंतरी अनेक अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये काम करण्यास नकार दिला, पण अल्लू अर्जुनने मात्र चाहत्यांना नाराज केलं नाही. एका मुलाखतीत अल्लूने बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. 

अभिनेता म्हणाला, 'हिंदीत अभिनय करणं सध्या माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे, पण पूर्ण प्रामाणिकपणे मी हिंदी सिनेमांमध्ये देखील भूमिका साकारेल...', अल्लूच्या वक्तव्याने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. 

अल्लू अर्जुनबद्दल सांगायचं झालं तर, मुंबईत देखील अभिनेत्याचं घर आहे. 'पुष्पा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडण्याआधीच अल्लू अर्जुन हिंदी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.

अल्लू अर्जुन हा स्टायलिश स्टार म्हणूनही ओळखला जातो, त्याच्या 'अर्बन स्वॅग' आणि बट्टा बोम्मा सारख्या व्हायरल गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. त्यामुळे आता अल्लू अर्जून कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल याकेड चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.