मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) यांच्या आयुष्यात सध्या खूप गडबड सुरू आहे. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. गरोदर असताना राजीवनं तिची फसवणूक केली असा गंभीर आरोप चारूनं केला होता. यावर आचा राजीवनं प्रतिक्रिया देत चारूवर देखील असाच आरोप केला आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राजीवनं चारूच्या सर्व आरोपांचे खंडन केले. चारूचे टीव्ही अभिनेता करण मेहरासोबत अफेअर असल्याचा धक्कादायक खुलासा राजीवनं यावेळी केला. त्यानं केलेल्या या आरोपाची पुष्टी करण्यासाठी राजीवनं चारूची आई नीलम असोपा यांची एक व्हॉइस नोट देखील सादर केली. राजीवने सांगितले की, चारूने करण मेहरासोबत रोमँटिक रील बनवलं होतं. राजीवला चारू आणि करणच्या रोमान्सचे सत्य अभिनेत्रीच्या आईने सांगितले.
याविषयी सांगताना राजीव म्हणाला, 'चारू आणि करण यांच्यात काय चाललं आहे याची मला कल्पना नव्हती. चारूनं माझ्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला, पण ती स्वतःच संशयाच्या भोवऱ्यात आहे. आपण कोणत्या जगात राहतो? चारूला ट्रस्ट इशू होते, मला नाही. चारूसारख्या व्यक्तीसोबत मी राहू शकत नाही. 'चारूला कळत नाही आहे ती काय करते. तिच्याविषयी माझ्या मनात असलेला आदर तिनं गमावला आहे. चारूचा Ego खूप वाढला आहे. याशिवाय राजीवनं चारूने केलेले मारहाणीचे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे '
राजीवनं चारू असोपावर वुमन कार्ड प्ले केल्याचा आरोप केला आहे. राजीवच्या म्हणण्यानुसार चारूनेही त्याची फसवणूक केली आहे. याविषयी बोलताना राजीव म्हणाला, 'माझ्या संपूर्ण कुटुंबानं चारूला प्रेम दिलं, तिला सगळ्यागोष्टींसाठी माझ्यापेक्षा जास्त पाठिंबा दिला. त्यानंतरही तिनं असे घाणेरडे आरोप केले. मी हे सगळं डिझर्व करत नाही. हा छळ आणि तिरस्कारासाठी मी तिला माफ करणार नाही.
चारू आणि राजीव 2019 मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघेही एकत्र कधीच सुखी नव्हते. त्यांनी या आधी एकदा घटस्फोट घेण्याचा निर्णय नाते पुन्हा पुन्हा तुटायचे आणि मग ते एकत्र यायचे. त्यांना 1 वर्षाची मुलगी आहे. चारू आणि राजीवचे नाते अशा प्रकारे तुटल्याचे पाहून त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे. (rajeev sen slams charu asopa allegations of cheating in pregnancy reveals she had affair with karan mehra)