राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीचे ते शब्द ऐकून सर्वजण भावुक..Video डोळ्यात पाणी आणतोय

आणि त्या धाय मोकलून रडू लागल्या.''माझं तर संपूर्ण आयुष्य निघून गेलं मी काय बोलणार...

Updated: Sep 26, 2022, 08:42 AM IST
राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीचे ते शब्द ऐकून सर्वजण भावुक..Video डोळ्यात पाणी आणतोय title=

Raju Srivastva prayer meet wife speech: जवळपास  41 दिवसांपासून मृत्यूच्या दारात असलेल्या विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची झुंज अपयशी ठरली आणि सर्वाना खदखदून हसवणारा अवलिया अखेर रडवून गेला ,त्यांच्या  जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर(film industry) शोककळा पसरलीय . नुकतीच त्यांची प्रेयर मीट(prayer meet of raju srivastav)पार पडली .यावेळी संपूर्ण सिनेसृष्टी राजू श्रीवास्तव (raju srivastav family)कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी एकवटली होती. 
कपिल शर्मा ,भरती सिंग,(kapil sharma,bharati singh)पासून अनेक कलाकार यावेळी हजर होते. 

दरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला(raju srivastav wife) त्यांच्याविषयी काही शब्द बोलण्यास सांगितलं असता त्यांना रडू आवरलं नाही आणि त्या धाय मोकलून रडू लागल्या.''माझं तर संपूर्ण आयुष्य निघून गेलं मी काय बोलणार, पण राजू श्रीवास्तव जिथे कुठे असतील ते सर्वाना

हसवतच असतील हे नक्की'' या शब्दात पत्नीने भावना मांडल्या. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर(social media) पाहिल्या नंतर सर्वच जण अत्यन्त भावुक(emotional) झाल्याचं पाहायला मिळत आहे. (raju shivastva wife prayer meet speech make u freeze and emotional video viral)

आणखी वाचा: Navratri 2022 : अवघ्या 2 मिनिटात नेसा परफेक्ट साडी..सेलिब्रिटी स्टायलिस्टनं दिल्या सोप्या Tips

राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका(heart attack) आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण 41 दिवसांनंतरही त्यांनी शुद्ध आली नाही. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला(raju srivastav death). गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्यांच्या

दिर्घायुष्यासाठी(longlife) प्रार्थना करत होते. पण राजू यांच्या निधनाची बातमी चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी ठरली  संपूर्ण जगाला आपल्या विनोदाने हासवणाऱ्या विनोदवीराचं (comedian)वयाच्या 59 व्या  वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण

झाली आहे. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट(gym workout)करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं,

आणखी वाचा: ''Akshay Kumarने माझा फक्त वापर केला''?..''त्याच्याकडे सगळं आहे पण तो प्रामाणिक नाही'' Raveena Tandonचं खळबळजनक वक्तव्य..

 काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती समोर आली. पण राजू यांनी जगाचा अचानक निरोप घेतल्यामुळे चाहत्यांच्या मोठा धक्का बसला आहे. नेहमी हसतमुख दिसणारा चेहरा, मग तो टीव्ही स्क्रीनवर (tv screen)असो किंवा सोशल मीडिया अकाऊंटवर, आपल्या

उत्कृष्ट विनोदबुद्धीमुळे कोट्यवधी लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजू यांचं निधन धक्कादायक आहे. मनोरंजन क्षेत्रात राजू यांची उणीव कोणीही भरून काढू शकणार नाही.