रामायणातील लव-कुश, आज एक अभिनेता तर दुसरा कंपनीचा सीईओ

रामायणातील लव-कुश आज काय करतात...

Updated: Apr 16, 2020, 10:22 AM IST
रामायणातील लव-कुश, आज एक अभिनेता तर दुसरा कंपनीचा सीईओ title=

मुंबई : रामानंद सागर यांचं रामायण दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित होत असून या ऐतिहासिक कार्यक्रमाने पुन्हा एकदा टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. पुन्हा एकदा रामायण आणि त्यातील पात्रांची कथा संपूर्ण देशभरात चर्चेत आहेत. रामायणातील कलाकारही अचानक चर्चेत आले आहेत, जे ग्लॅमरस टीव्ही शो आणि चित्रपटांच्या चकाकीत कुठेतरी हरवले आहेत.

रामायणातील उर्वरित पात्रांप्रमाणेच या कार्यक्रमात लव-कुशची भूमिका साकारणारी तत्कालीन बाल कलाकारही मोठी झाली आहेत. ही भूमिका दोन मराठी मुलांनी केली होती.

I accepted 'Welcome Zindagi' to satisfy myself and the audience ...

रामायणात लव आणि कुश यांच्या भूमिका अभिनेता स्वप्नील जोशी आणि मयुरेश क्षत्रदे यांनी साकारल्या होत्या. रामायणाला बराच काळ झाला आहे. पण या दोघांपैकी एक आज मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय अभिनेता आहे. तर दुसरा न्यू जर्सीमध्ये एका मोठ्या पदावर कार्यरत आहे.

स्वप्निल जोशीने अनेक लोकप्रिय चित्रपट केले आहेत. तर कुशची भूमिका साकारणारा महेश परदेशात राहतो. मयुरेश एका खासगी कंपनीत अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात.

About Us | CJ Affiliate

यापूर्वी त्यांने याच क्षेत्रातील काही नामांकित कंपन्यांसाठी व्यवस्थापकीय संचालकपद भूषवले आहे. तो एक अद्भुत लेखक देखील आहे आणि “स्पाय अँड डेव्हलपमेंट” हे पुस्तक त्यांनी इतर दोन परदेशी लेखकांसोबत मिळून लिहिले आहे असे देखील म्हणतात.