Ranbir Kapoor : सौरव गांगुलींच्या बायोपिकला रणबीरचा नकार, नेमकं कारण काय?

Sourav Ganguly Biopic : भारतीय क्रिकेटचा दादा म्हणजेच सौरव गांगुलींच्या (Sourav Ganguly) जीवनावर आधारित चित्रपट येणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा दादाची भूमिका साकारणार होता. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे. 

Updated: Feb 28, 2023, 09:09 AM IST
Ranbir Kapoor : सौरव गांगुलींच्या बायोपिकला रणबीरचा नकार, नेमकं कारण काय? title=
Ranbir Kapoor denies working in Sourav Gangulys biopic

Ranbir Kapoor : भारताचा यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलींच्या (Sourav Ganguly) जीवनावर आधारित चित्रपट येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र या चर्चांना अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) पूर्णविराम लावला आहे. दरम्यान सौरव गांगुलींच्या बायोपिकमध्ये (Sourav Ganguly Biopic) रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार होता. मात्र रणबीरने या भुमिकेसाठी नकार दिला आहे. याबाबत रणबीरने स्वत: पुष्टी केली की तो सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करत नाही. नेमकं असं का म्हणाला रणबीर कपूर जाणून घेऊया... 

सध्या रणबीर कपूर हा तू झुठी मैं मक्कार च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  कोलकाता येथे एका प्रमोशन इव्हेंटमध्ये रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) पुष्टी केली की, तो सौरव गांगुलीच्या नव्हे तर दिग्गज गायक- अभिनेता किशोर कुमारच्या (kishor Kumar) बायोपिकमध्ये काम करणार आहे. चंदीगडनंतर रणबीर कोलकातामध्ये आला होता. त्यावेळी रणबीर हा सौरव गांगुलीसोबत ईडन गार्डन्सवर क्रिकेट खेळताना दिसला. परिणामी दोघांच्या एकत्र छायाचित्रांमुळे सौरव गांगुलींच्या बायोपिकच्या (Sourav Ganguly Biopic) अफवांना उधाण आले. याचदरम्यान रणबीरला विचारण्यात आले की, तो क्रिकेटर सौरव गांगुलीचा बायोपिक करतो का? 

वाचा: किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये झळकणार 'हा' अभिनेता, तर कोण साकारणार मधुबाला यांची भूमिका?

त्यावर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) म्हणाला, मला वाटते दादा हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील एक लिविंग लेजंड आहेत आणि त्यांच्यावर बनवलेला बायोपिक खूप खास असेल, मात्र मला या चित्रपटाची ऑफर अद्याप आलेली नाही. मला वाटते लव फिल्म्सचे निर्माते अजूनही स्क्रिप्ट लिहीत  आहेत, अशी माहिती रणबीर कपूरने मीडियासमोर दिली आहे.  

त्याचबरोबर, मी गेली 11 वर्ष किशोर कुमार यांच्या बायोपिकवर काम करत आहे. यावर काम सुरू असून अनुराग बसू आणि मी आशा करतो की हा माझा पुढील बायोपिक असेल. पण आतापर्यंत मला दादावर बायोपिक बनवण्याबद्दल काहीही ऐकले नाही, तसेच मला माहित नाही, असे स्पष्टीकरण रणबीर कपूरने यावेळी मीडियासमोर दिले आहे. दरम्यान येत्या 8 मार्च ला रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपट प्रदर्शित होणार आहे.