गोविंदाचा हा 'रंगीला' आवतार चाहत्यांना भावला नाही

१८ जानेवारी रोजी गोविंदाचा रंगीला राजा प्रदर्शित झाला. गोविंदाचा रंगीला राजा चाहत्याचे मनोरंजन करण्यात फोल ठरला.

Updated: Jan 19, 2019, 02:27 PM IST
गोविंदाचा हा 'रंगीला' आवतार चाहत्यांना भावला नाही title=

मुंबई:बॉलिवूड अभनेता गोविंदाने त्याच्या चाहत्यांसाठी एक सिनामा घेऊन आला आहे. १८ जानेवारी रोजी गोविंदाचा रंगीला राजा प्रदर्शित झाला. पण गोविंदाचा हा रंगीला आवतार त्याच्या चाहत्यांना फारसा भावला नसल्याचे दिसत आहे. गोविंदाचा रंगीला राजा पहिल्या दिवशी ५० लाख ते १ कोटींचा गल्ला जमवेल असा अंदाज दर्शवण्यात आला. पण या रंगीला राजाने बॉक्सऑफिसवर काही खास रंगत आणली नाही. चाहत्यांनी सिनेमाकडे पाठ फिरवल्याचे दिसते.ट्रेड अॅनलिस्ट रोहित जैसवाल यांच्या म्हनण्यानुसार फ्रॉड सैंया, रंगीला राजा, वॉशआउट हे सिनेमे एकमेकांपूढे अव्हान म्हणून उभे आहेत. राधीका आपटेचा सिनेमा बॉम्बारिया, अरशद वारसीचा सिनेमा फ्रॉड सैंया त्याच प्रमाणे इमरान हश्मीचा Why Cheat India यांच्यामध्ये दमदार टक्कर असल्याचे दिसते.असे मानले जात होते की अतशदचा सिनेमा बॉक्सऑफिसवर पहिल्या दिवशी १ ते २ कोटींचा गल्ला जमवेल पण असे झाले नाही. 

गोविंदाचा रंगीला राजा चाहत्याचे मनोरंजन करण्यात फोल ठरला. याआधी गोविंदाचा एक सिनेमा आला होता. सिनेमात वरुन सुध्दा होता पण बॉक्सऑफिसवर सिनेमाने खास कमाई केली नाही