नवी दिल्ली : संजय लीला भन्साळींचा पद्मावती हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही.
१ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. रिपोर्टनुसार, हा चित्रपट पुढल्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.
भन्साळींच्या या चित्रपटाची कथा महाराणी पद्मावतीच्या जीवनावर आधारित आहे. या महाराणी पद्मावतीच्या भुमिकेत अभिनेत्री दीपिका पदुकोण आहे. याव्यतिरिक्त शाहीद कपूर राजा रतन सिंगच्या भुमिकेत दिसणार आहे. तर रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजीची नकारात्मक भुमिका साकारत आहे.
याबद्दल बोलताना रणवीर म्हणाला की, भन्साळींनी नेहमीच मला माझ्या भुमिकेत स्वातंत्र्य दिले. मला जे करायचे आहे ते करण्याची मुभा दिली.... पण अलाउद्दीन खिलजीबद्दल त्यांच्या मनात स्पष्ट चित्र होते. त्यांना माझ्याकडून काय हवे आहे, हे त्यांना पुर्णपणे माहित होते. अनेकदा मला काही समजायचे नाही. मी सेट सोडून पळून जायचो आणि खूप रडायचो. पुन्हा परत येऊन सीन पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचो.
अलाउद्दीन खिलजी आणि पद्मावतीची कथा सूफी कवि मल्लिक मोहम्मद जायसी यांनी शेर शाह सूरीच्या काळात १५४० मध्ये लिहिली होती.