मुंबई : बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण इटलीमध्ये विवाह बंधनात अडकले. या जोडप्यानं १४ आणि १५ नोव्हेंबर अशा दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाची पहिली झलक गुरुवारी आपल्या फॅन्ससाठी जाहीर केली. दीपिका आणि रणवीर, दोघांनीही केवळ दोन फोटो सोशल मीडियावरून आपल्या फॅन्सशी शेअर केले. यातील एका फोटोत कोकणी परंपरेनुसार तर दुसरा विवाह सिंधी परंपरेनुसार होताना दिसतोय. याच दरम्यान रणवीर सिंगच्या हळदीचे काही फोटोही समोर आलेत.
कास्टिंग डायरेक्टर शन्नो शर्मा हिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीर सिंहच्या हळदी सेरेमनीचे काही फोटो शेअर केलेत. यामध्ये रणवीरच्या गालांवर हळद लागलेली दिसतेय... आणि त्याच्यासोबत शन्नो शर्मा सेल्फी घेताना दिसतेय. सफेद कुर्त्यात बाजीराव तिच्यासोबत खुपच खुश दिसतोय.
यापूर्वीही या समारंभाचे काही फोटो समोर आले होते. हळदी समारंभासाठी रणवीरचं घर फुलांनी सजलेलं होतं.... आणि रणवीरच्या माथ्यावर टिळाही लावलेला होता.
दीपिका - रणवीरचा विवाह सोहळा इटलीतील लेक कोमो इथं पार पडला. १४ नोव्हेंबरला दीपिकाच्या कोकणी पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.
कोकणी पद्धतीनुसार दीपिकाने सोनेरी-लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता तर रणवीरने सफेद-सोनेरी रंगाचा कुर्ता-धोती परिधान केली होती. या दोन्ही जोड्यांचे कपडे हे लोकप्रिय डिझाइनर सब्यासाचीनं तयार केले आहेत. सिंधी परंपरेनुसार विवाह पार पडताना रणवीर सिंहने कांजीवरम शेरवानी घातली होती... तर दीपिका सब्यासाचीच्या सिग्नेचर लेहंग्यामध्ये होती. लेहंग्यावर असलेल्या ओढणीची खास चर्चा होती. कारण या ओढणीवर खास आशिर्वाद लिहिला होता. दीपिकाच्या लेहंग्यावर जी ओढणी होती त्यावर 'सदा सौभाग्यवती भव' असा हिंदू परंपरेनुसार दिला जाणारा आशिर्वाद लिहिला होता. हा लेहंगा नवऱ्याच्या कुटुंबियांकडून नववधुला दिला जातो.