रणबीर कपूर नंतर आता रणवीर सिंहच्या मस्कुलर बॉडीचे फोटोज आले समोर.....

 रणबीर कपूर पाठोपाठच रणवीर सिंहच्या मस्क्युलर बॉडीची चर्चा..... 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 9, 2017, 04:46 PM IST
रणबीर कपूर नंतर आता रणवीर सिंहच्या मस्कुलर बॉडीचे फोटोज आले समोर.....  title=

मुंबई :  रणबीर कपूर पाठोपाठच रणवीर सिंहच्या मस्क्युलर बॉडीची चर्चा..... 

काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरच्या ट्रेनरने त्याच्या मस्कुलर बॉडीचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. आणि यामुळे सगळीकडे एकच चर्चा होती. अवघ्या काही मिनिटांत हा फोटो व्हायरल झाला. आणि त्या पाठोपाठ बॉलिवूड स्टार रणवीर सिंहच्या ट्रेनरने देखील दोन फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.त्या ट्रेनरने बॉडी बनवण्या अगोदरचे आणि नंतरचे फोटो देखील इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत. या फोटोत तुम्ही पाहू शकता की, ६ आठवड्यात रणवीर सिंहने कशा प्रकारे बॉडी केली आहे. 

त्याने प्रचंड मेहनत करून ६ आठवड्यात एवढी चांगली बॉडी केली आहे. रणवीर सिंहचा पर्सनल ट्रेनर लॉयड स्टीवंसने रणवीर सिंहचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये तो म्हणतो, की अगदी ६ आठवड्यात त्याच्या शरिरातील बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याने म्हटलंय की, रणवीरच्या या ६ आठवड्यातील मेहनतीला मी फक्त साथ दिली आहे. 

मी अगोदर हा फोटो शेअर केला नाही. मात्र जेव्हा पण ही हा फोटो बघतो तेव्हा मला रणवीरचा प्रचंड अभिमान वाटतो. कारण यासाठी आम्ही प्रचंड मेहनत केली आहे. रणवीर सिंहच्या प्रचंड मेहनतीची दाद द्यावी तेवढी कमीच आहे. कारण बऱ्याचदा रणवीर सिंहचं बिझी शेड्युअल असायचं तेव्हा आणि रात्री एक्सरसाइज करायचो. किंवा अगदी भल्या पहाटे एक्सरसाइज करायचो. आणि फक्त ६ आठवड्यात आम्ही ही बॉडी कमावली आहे.