मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेगडेवर बलात्काराचा आरोप करणारी महिला 30 वर्षीय ब्यूटीशियन आहे. कुमार हेगडेने महिलेला लग्नाचं आमिष दाखूल तिच्यावर बलात्कार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसा पीडित महिला आणि हेगडे गेल्या वर्षी जून महिन्यात शुटींग दरम्यान एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांच्या भेटीचं प्रेमात रूपांतर झालं. शिवाय दोघे लिव्हइनमध्ये देखील राहत होते.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, हेगडेने सर्वप्रथम महिलेले लग्नासाठी मागणी घातली होती. त्यानंतर दोघे लिव्हइनमध्ये देखील राहत होते. जेव्हा महिलेने शारीरिक संबंधास नकार दिला, तेव्हा कुमार हेगडेने महिलेवर सक्ती केली. त्याचप्रमाणे हेगडेने 50 हजार रूपये घेतल्याचा आरोप देखील महिलेने केला आहे.
आईची प्रकृती स्थिर नसल्याचं कारण सांगत हेगडेने महिलेकडून 50 हजार रूपये घेतले. पण त्यानंतर तो परतलाचं नाही. असं देखील महिलेने सांगितलं आहे. कुमार हेगडे कंगनाचा बॉडीगार्ड आहे. तर कंगना बद्दल सांगायचं झालं तर ती कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडल्यानंतर सध्या मनालीमध्ये तिच्या कुटुंबासोबत आहे.