close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून वयाने मोठ्या महिलांना डेट करायचा प्रियांकाचा पती निक जोनास

प्रियांकापूर्वी यांच्याशी जोडलं गेलं आहे त्याचं  नाव  

Updated: Sep 25, 2019, 01:58 PM IST
...म्हणून वयाने मोठ्या महिलांना डेट करायचा प्रियांकाचा पती निक जोनास

मुंबई : 'देसी गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मागील वर्षी अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी लग्नगाठ बांधली. निक आणि प्रियांका यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. निक आणि प्रियांका यांनी लग्न केल्यानंतर किंबहुना फार आधीपासूनच ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करुन होती. काही कारणांनी चर्चेतही होती. 

प्रियांका- निकचं नातं चर्चेत असणाऱ्या कारणांपैकी एक म्हणजे या दोघांमध्ये असणारं वयाचं अंतर. प्रियांका ही निकपेक्षा वयाने मोठी आहे, हीच बाब हेरत अनेकांनी या जोडीची खिल्लीही उडवली. पण, अर्थातच या दोघांनीही हे खिल्ली उडवण्याचं प्रकरण नात्यापासून दूरच ठेवलं. 

मुख्य म्हणजे प्रियांकाला डेट करण्यापूर्वीही निकचं नाव काहीजणींशी जोडलं गेलं होतं. इथे रंजक बाब अशी की, निकने जितक्याजणींना डेट केलं त्या त्याच्याहून वयाने मोठ्याच होत्या. काही वर्षांपूर्वीच एका चॅट शोमध्ये खुद्द निकने याचा खुलासा केला होता. आपण स्वत:हून वयाने मोठ्याच मुलींना डेट करतो कारण, मला काय हवं आहे हे त्या जाणतात, असं कारण निकने दिलं होतं. 

निकने आतापर्यंत डेमी मूर्स, डेल्टा गुडरेम (३३ वर्षे), केट हडसन (३८ वर्षे) यांनाही डेट केलं आहे. निक हा कायमच प्रसिद्धीझोतात असणाऱ्या काही सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्याच्या चाहत्यांचा आकडाही थक्क करणारा आहे. भूतकाळातील त्याची ही डेटिंगची सवय पाहता, सोशल मीडियावरही तो कायमच सर्वांचं लक्ष वेधत होता. 

दरम्यान, सध्या निक त्याच्या वैवाहिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. प्रियांकासोबत विविध कार्यक्रमांना हजेरा लावण्यापासून ते तिच्या कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत करणं असो, एक आदर्श पती म्हणून तो कायमच देसी गर्लची साथ देतो.