ग्रामीण भाषेत रितेशची पोस्ट! चाहते म्हणाले, "या वाघाची शिकारही घरच्या हरणीनं केली"

Riteish Deshmukh Funny Video : रितेश देशमुखनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी भन्नाट कमेंट देखील प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, यावेळी रितेश एकटा असून त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी जिनिलियाला मिस करत असल्याचे म्हटले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 11, 2023, 10:39 AM IST
ग्रामीण भाषेत रितेशची पोस्ट! चाहते म्हणाले, "या वाघाची शिकारही घरच्या हरणीनं केली" title=
(Photo Credit : Social Media)

Riteish Deshmukh Funny Video : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या जोडीचे लाखो चाहते. रितेश आणि जिनिलिया हे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. रितेश आणि जिनिलिया यांचे अनेक भन्नाट रील हे सोशल मीडियावर व्हायरल होतात. असंच एक रील रितेशनं नुकतंच शेअर केलं आहे. या रीलमध्ये रितेशनं लग्नानंतरचं आयुष्य कसं असते ते सांगितलं आहे. 

रितेशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे रील शेअर केलेलं आहे. या रीलमध्ये मेकअप आर्टिस्ट रितेशचा मेकअप करताना दिसत आहे. तर दुसरीकडे तो कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसतोय अशात एक महिला त्यावेळी पाठून बोलते “झाली की नाही कामावरुन सुट्टी? दिसतो की नाही घरचा रस्ता. लवकर घराकडे निघा. नाहीतर घरी आल्यावर काय ते बघावं लागेल”. खरंतर हा या महिलेचा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत रितेशनं कॅप्शन दिलं आहे की "लग्न झाल्यानंतर..." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रितेशचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, "म्हणून सांगितले होते की जिनिलिया वहिनींना बचत गटा मध्ये नको टाकुस". दुसरा नेटकरी म्हणाला, "भाऊ आतापण वेळ आहे सॉरी बोलून टाक." तिसरा नेटकरी म्हणाला, "मराठवाड्यातील परिस्थिती." आणखी एक नेटकरी म्हणाला, "जिनिलिया लातुरची असती तर." दुसरा नेटकरी म्हणाला, "हा लवकर घराकडे निघा... जिनिलिया तुला या व्हिडीओत मिस करतोय आम्ही." तिसरा नेटकरी म्हणाला, "जिनिलियाच्या आवाजात हे ऐकायचं आहे." तर एक नेटकरी म्हणाला, "पहिल्यांदा तर मनापासुन धन्यवाद दादा माझी कमेंट तुम्ही वाचाल का नाही माहीत नाय पण खरच तुमच करल तेवढ कौतुक कमीच आहे आज तुम्ही एवढे मोठे सेलिब्रिटी असुन तुम्ही एका साधारण परिवारातील गावठी महिलेच्या आवाजावर व्हिडिओ बनवला मला मनापासुन तुमचा अभिमान वाटतोय लाख लाख धन्यवाद" "एका वाघाची शिकार एका हरणीने केली", असं एक नेटकरी म्हणाला. तर दुसरा म्हणाला, "तुम्हाला पण वहिनी दम देतात का?" तिसरा म्हणाला, भाऊ माझी पण अशीच हालत आहे. तर एक म्हणाला, "जिनिलीया वहिनींचा दरारा आहे." 

हेही वाचा : वनिता खरातनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रेतील’ हा कलाकार करतोय कोकण सफारी, फोटो व्हायरल

रितेश आणि जिनिलिया या दोघांचं लग्न 2012 साली झालं आहे. त्या दोघांना दोन मुलं असून रिहान आणि राहील अशी त्यांची नावं आहेत.