सैफ-करीनाच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याच्या 'त्या' कृतीमुळे चाहते चिंतेत

Saif Ali Khan and Kareena Kapoor : सैफ अली खान आणि करीनाच्या नात्यात आला दुरावा... नक्की काय झालं असं... 

दिक्षा पाटील | Updated: May 14, 2024, 04:31 PM IST
सैफ-करीनाच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याच्या 'त्या' कृतीमुळे चाहते चिंतेत title=
(Photo Credit : Social Media)

Saif Ali Khan and Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांची जोडी लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. कालच त्या दोघांचा किस करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले. इतक्यात आता सैफचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे म्हटले जात आहे. 

फिल्मी ग्यान या इन्स्टाग्रामवरील पेजनं सैफचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सैफच्या हातावरचा करीनाच्या नावाचा टॅटू त्यानं काढून टाकला असून त्याठिकाणी त्यानं एक नवा टॅट्यू काढला आहे. सैफ अली खानचा हा फोटो विमानतळावरचा आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी सैफ अली खाननं त्याच्या हातावर करीनाच्या नावाचा टॅट्यू काढला होता. त्यानं हा टॅट्यू काढून टाकल्याचं या व्हायरल फोटोमध्ये दिसत आहे. त्याठिकाणी सैफनं एक वेगळाच टॅटू काढला असून या टॅटूमध्ये एक त्रिशुळ दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'घटस्फोच नक्कीच होणार.' दुसरा म्हणाला, 'आता पत्नी बदलणार.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आता फक्त टॅटू बदलला आहे, नंतर पत्नी बदलणार.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'असं वाटतंय घटस्फोटाची तयारी सुरु झाली आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'असं वाटतंय तिसऱ्या पत्नीच्या तयारीत आहे.' 

हेही वाचा : अल्लू अर्जुन विसरा, आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहे मल्टीलिंगुअल स्टार! 6 भाषांमध्ये केलंय काम, ओळखलंत का?

दरम्यान, काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की हे सैफनं त्याच्या आगामी चित्रपटासाठी केले आहे. एक नेटकरी म्हणाला की 'सैफ अली खान हा लवकरच ज्युनियर एनटीआरच्या देवारा पार्ट 1 मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय सिद्धार्थ आनंदच्या ज्वेल थीफ यात दिसणार आहे.' तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'सगळ्यांनी शांत व्हा... त्याच्या आगामी चित्रपटासाठी हे सगळं करण्यात आलं आहे.'