...म्हणून सैफला सतावतेय साराची चिंता !

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान  ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 29, 2017, 08:34 PM IST
 ...म्हणून सैफला सतावतेय साराची चिंता !  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : सैफ अली खानची मुलगी सारा अली खान  ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत दिसणार आहे. आपल्या डेब्यू चित्रपटासाठी ती पुष्कळ मेहनत घेत आहे. त्याचबरोबर तिने स्वतः मध्ये देखील काही बदल केल्याचं समजतं. सैफची मुलगी म्हणजे लोकांच्या अपेक्षा स्वाभाविकच अधिक असणार. त्यामुळे सैफ आपल्या मुलीसाठी काहीसा काळजीत आहे. 

वडील म्हणून साराविषयी असलेली काळजी त्याने ‘मिड डे' ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. ''साराची मला काळजी वाटते आणि ते अत्यंत स्वाभाविक आहे. माझ्या मनावर दडपण नाही. पण काळजी आहे. तिच्या पदार्पणात तिला अपेक्षित यश मिळालं नाही तर ती ते कसं हाताळेल ? हताश होईल की रडेल ? या गोष्टीची मला काळजी वाटते,'' असं सैफ म्हणाला. 

साराच्या पहिल्या चित्रपट निवडीविषयी सांगताना सैफ म्हणाला,"केदारनाथ’ चित्रपटाची निवड हा सर्वस्वी साराचा निर्णय होता. मी तिच्यासोबत चित्रपटाच्या स्क्रीप्टविषयीही चर्चा केली नाही. ती माझ्याकडे आली आणि मला चित्रपटात काम करणार असल्याचे तिने सांगितले. आम्ही चित्रपटाविषयी काहीच चर्चा केली नाही.  इथे माझं मत फारसं महत्त्वाचं नाहीये."  तिने तिच्या आवडत्या क्षेत्राची निवड केल्याचा मला आनंद आहे." मी  तिला फक्त कामासोबत एकनिष्ठ राहण्याची शिकवण दिली आहे, असंही त्याने सांगितलं.