'या' अभिनेत्यासारखी हो, सैफचा लेकीला सल्ला

'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

Updated: Sep 23, 2019, 07:03 PM IST
'या' अभिनेत्यासारखी हो, सैफचा लेकीला सल्ला title=

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर चांगलेच वर्चस्व निर्माण केले आहे. तिच्या या मेहनतीचे फळ सुद्धा तिला चांगलेच मिळाले आहे. तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री या पुरस्कारने अनेकवेळा सन्मानीत देखील करण्यात आले. 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happiest birthday Abba I love you so much 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

एका मुलाखतीदरम्यान त्याने एक खुलासा केला होता. त्याने साराला फक्त तिच्या कलेवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. त्याचबरोबर अमिर खान सारख्या आभिनेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा सल्ला त्याने साराला बॉलिवूड पदार्पणा पूर्वी दिला होता. जे जीवनात स्वत:चे नियम स्वत:च तयार करतात.  

कार्तिक आणि सारा त्यांच्या आगामी 'लव आज कल २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल २' १४ फेब्रुवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय सारा 'कुली नंबर १' चित्रपटातून वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.