'कतरिना कपूर' असा उल्लेख करत सलमानकडून कॅटचा अपमान

या प्रकरणाने सगळेच हैराण

Updated: Jan 25, 2021, 11:15 AM IST
'कतरिना कपूर' असा उल्लेख करत सलमानकडून कॅटचा अपमान  title=

मुंबई : सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ ( Katrina Kaif) यांच्यातील नातं कधीच लपलं नाही. या दोघांनी कधीच जाहिरपणे आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. पण या दोघांच्या नात्याची चर्चा मात्र भरपूर होते. सलमान खानच्या मनात कतरिनाबद्दल काही खास भावना आहेत हे अनेकदा दिसला आहे. पण कतरिनाच्या आयुष्यात अभिनेता रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि पुन्हा एकदा सलमान खान (Salman Khan insult Katrina Kaif) दुखावला गेला. 

दुखावलेल्या सलमान खानने भर कार्यक्रमात कतरिनाचा अपमान केला होता. कतरिनाला डिवचण्याची एकही संधी सलमान खानने सोडली नव्हते. त्याने सर्वांसमोर कतरिनाला अपमानास्पद वागणूक दिली होती. कतरिना आणि रणबीरच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगत होत्या. त्यामुळे सलमान खान दुखावला जात होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

करण जोहरच्या शोमध्ये सलमान खानने याबाबत खुलासा केला आहे. 'तू कतरिना कैफ जवळ बसून सकाळी उठलास, तर तुझी पहिली रिऍक्शन काय असेल?' या प्रश्नाने सलमान चकित झाला. त्याने उत्तर दिलं की,'रणबीर तुम कहा हो...'

सलमानची बहिण अर्पिताच्या लग्नातही सलमान खानने सर्वांसमोर कतरिनाचा अपमान केला हता. या लग्नात कतरिना हजर होती तेव्हा तिचं 'चिकनी चमेली' हे गाणं वाजत होतं. तेव्हा सलमानने कतरिनाला स्टेजवर डान्स करायला बोलावलं होतं. पण कतरिनाने नकार दिला. त्यानंतर सलमान म्हणाला,"कतरिना कैफ नाही कतरिना कपूर.... आता तर डान्स करायला ये.' सलमान एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने म्हटलं की, 'मी तुला कतरिना कैफ बनण्याची संधी दिली. पण तुला तर कतरिना कपूर बनायचे होते.' सलमानचं हे बोलणं ऐकून सगळेच थक्क झाले.