सलमान खानच्या घरी लवकरच लगीनघाई

काय होणार पुढे 

सलमान खानच्या घरी लवकरच लगीनघाई

मुंबई : सलमान खान जरी 52 वर्षांचा असला तरीही त्याचं अजून लग्न झालेलं नाही. आता त्याचा छोटा भाऊ अरबाज खान दुसऱ्या लग्नासाठी तयार झाला आहे. आपल्याला माहितच आहे अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 

बऱ्याच दिवसांपासून हे दोघं अनेक कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत. आता लवकरच हे दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत. स्पॉटबॉय डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार अरबाज आणि जॉर्जिया लवकरच कोर्ट मॅरेज करणार आहेत. त्यांच्या या नात्याला 'खान' कुटुंबियांनी देखील परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात अर्पिता खानच्या घरी गणेशोत्सव साजरा झाला. तेव्हा अरबाज आणि जॉर्जिया दोघं एकमेकांसोबत दिसले. जॉर्जियाचे वडिल आणि बहिण देखील यावेळी आले होते. 

या कार्यक्रमा दरम्यान अरबाज खानची पत्नी मलायका अरोरा देखील उपस्थित होती. मलायका आणि जॉर्जिया यांच चांगल बॉन्डींग आहे. असं वाटत होतं या दोघी एकत्र आल्या की, वाद होतील पण तसं काही झालं नाही. दोघी पण एकमेकांशी संवाद साधताना दिसल्या. अरबाज लवकरच आपली पत्नी जॉर्जियाला बॉलिवूडमध्ये लाँच करताना दिसणार आहे. तसेच याकरता प्रोफेशनल एजन्सीची देखील मदत घेतील आहे. जॉर्जिया लग्नानंतर बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.