कोणाचं लग्न ठरल्यानंतर सलमानला सर्वात जास्त दुःख झालं? भाईजानकडून भावना व्यक्त

अनेक अभिनेत्रींसोबत सलमानचं अफेअर, पण...  

Updated: Dec 7, 2021, 10:55 AM IST
कोणाचं लग्न ठरल्यानंतर सलमानला सर्वात जास्त दुःख झालं? भाईजानकडून भावना व्यक्त

मुंबई : चाहत्यांचा लाडका अभिनेता म्हणजे सलमान खान. भाईजानचा कोणताही सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमागृहात चाहत्यांची एकच गर्दी जमते. आता तर तब्बल दोन वर्षांनंतर 'अंतिम' सिनेमाच्या माध्यमातून सलमान चाहत्यांच्या भेटीला आला. सलमानने सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान त्याने अनेक रिऍलिटी शोमध्ये हजेरी लावली. त्यामधील एक शो म्हणजे 'झी सा रे ग मा पा'. 

शोमध्ये त्याने स्पर्धांकांसोबत प्रचंड मस्ती केली. एवढंच नाही तर त्याने स्पर्धकांसोबत सूर मिळवतं गाण्यावर ठेका देखली धरला. यावेळी आदीत्य नारायणने सलमानला अनेक प्रश्न विचारले. प्रश्नांची उत्तर देताना देखील सलमान आनंदी होता. दरम्यान त्याने सलमानला लग्नाबद्दल एक प्रश्न विचारला. 

आदित्यने सलमानला विचारलं, 'तू अंतिम कोणाच्या लग्नात नाराज झाला होतास?' या प्रश्नाचं उत्तर देताना सलमान म्हणाला, 'आतापर्यंत मी कोणाच्याही लग्नानंतर नाराज झालो नाही. मी प्रत्येकासाठी आनंदी असतो..'

सध्या सलमानचा अंतिम सिनेमा रूपेरी पडद्यावर जोरदार कामगिरी करत आहे. सिनेमात सलमान व्यतिरिक्त अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री महिमा मकवाना मुख्य भूमिकेत आहेत.