सलमान खान देणार मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये संधी ?

२१ वर्षीय मानुषी छिल्लरने यंदा 'मिस वर्ल्ड' हा किताब पटवला आहे.

Updated: Nov 29, 2017, 03:13 PM IST
सलमान खान देणार मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये संधी ?

मुंबई : २१ वर्षीय मानुषी छिल्लरने यंदा 'मिस वर्ल्ड' हा किताब पटवला आहे.

भारतात आगमन झाल्यानंतर मीडीयाने तिच्या वर प्रश्नाचा भडीमार केला आहे. पण मानुषीने सध्या बॉलिवूडचा विचार नसल्याचे सांगितले आहे. 

आवडते स्टार्स 

मेडिकलची विद्यार्थिनी असणारी मानुषी बॉलिवूडऐवजी स्त्रियांच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष देणार आहे. मासिकपाळी आणि स्वच्छता याबाबत तिला समाजात काम करण्याची इच्छा आहे. त्याला मानुषी प्राधान्य देणार आहे.  

बॉलिवूडमध्ये पदार्पणाचा सध्या प्लॅन नसला तरीही आवडते कलाकार कोण ? याबाबत बोलताना मानुषीने आमिर खान आणि प्रियांका चोप्रा यांच्या नावाला पसंती दिली आहे. 

अनेक फिल्ममेकर्सच्या ऑफर तयार 

मानुषीचा 'मिस वर्ल्ड'मधील परफॉरमन्स पाहून अनेकांनी तिच्यासाठी चित्रपटाच्या ऑफर बनवल्या आहेत.  

सलमान खानही सज्ज 

अनेक तरूण टॅलेंटला बॉलिवूडमध्ये ग्रॅन्ड एन्ट्री मिळवून देण्यासाठी सलमान खान फारच प्रसिद्ध आहे. लवकरच तो मानुषीलादेखील लॉन्च करणार असल्याचा अंदाज काही मीडीया रिपोर्टने दिला आहे. बॉलिवूड लाईफच्या सूत्रांनुसार, सलमान खान मानुषीच्या परफॉर्मन्सवर फीदा आहे. भविष्यात तो त्याच्या प्रोडक्शनखाली तयार होणार्‍या चित्रपटामध्ये मानुषीला संधी देण्याची शक्यता आहे.