close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सलमानच्या 'भारत'ची बॉक्स ऑफिसवर 'डबल सेंचुरी'

१४ दिवसांत २०० कोटींचा आकडा पार

Updated: Jun 19, 2019, 08:56 PM IST
सलमानच्या 'भारत'ची बॉक्स ऑफिसवर 'डबल सेंचुरी'

मुंबई : बॉलिवूड दबंग खान सलमानचा 'भारत' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर ५ जून रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर 'भारत'ने तुफान कमाई करत बॉक्स ऑफिसवर 'डबर सेंचुरी' केली आहे. आतापर्यंत २०० कोटींचा आकडा पार करत चित्रपटाने चाहत्यांची चांगलीच पसंती मिळवली आहे. 

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'भारत'ने सलग १४ दिवसांत २०० कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत'ची प्रदर्शनाच्या आधीपासूनच मोठी चर्चा होती. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंगही केलं होतं. चित्रपट प्रदर्शनाच्या आधीप्रमाणेच, प्रदर्शनानंतरही 'भारत' आपली यशस्वी घौडदौड चालूच ठेवली आहे.

सलमान खान, कतरिना कैफ यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात दिशा पटानी, सुनिल ग्रोवर, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, असिफ शेख अशा तगड्या स्टारकास्टने चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे.