अमेरिका : टेलिव्हजन, सिनेमाहॉल आणि आता थेट लाईव्ह परफॉर्मन्सेस अशा सार्याच ठिकाणी सलमान खानची जादू कायम आहे. 'रेस 3' च्या सुपरहीट यशानंतर सध्या समनान खान अमेरिकेत 'दबंग टुर' घेऊन आला आहे. सलमान खान सोबत जॅकलीन, कॅटरिना, सोनाक्षी सिन्हा, डेजी शहा या अभिनेत्री आहेत. अमेरिकेतील चाहत्यांसमोरही सलमान खान त्याचा खास 'भाईजान' अंदाजामध्ये दिसत आहे.
Tu Atom Bomb hui darling tere liye. #SalmanKhan
Performing in #munni Badnam hui #DabanggReloaded #DabanggReloadedHungama pic.twitter.com/EQzVZrdK4F— sabina lamba (@SabinaLamba) June 25, 2018
अमेरिकेमध्ये एका लाईव्ह परफॉरमन्स दरम्यान 'दबंग' चित्रपटातील 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यावर सलमान खान थिरकला. सलमानचा हा अंदाज पाहून त्याच्या फॅन्सनेही दाद दिली. सोशल मीडियावरही या डान्सची व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. मूळ गाण्यामध्ये अभिनेत्री मलायका अरोरा या गाण्यावर थिरकली आहे.
.@BeingSalmanKhan performs with the kids of Arya Dance Academy ...what a cute sight!!!#DabanggReloadedHungama #Atlanta pic.twitter.com/MvLkiQUsUp
— SIkanDeR RulEs (@ISalmans_Rules) June 23, 2018
आर्य डान्स अकॅडमीच्या चिमुकल्यांसोबतही सलमान खान 'सेल्फी ले..' गाण्यावर थिरकला आहे.
सलमान खानच्या या वर्ल्ड टूरमध्ये त्याच्या अभिनेत्रींसोबतच प्रभूदेवा, पंजाबी गायक गुरू रंधावा, मनीष पॉल सहभागी होणार आहे. 22 जूनपासून अमेरिकेत सलमान खान आणि बॉलिवूड स्टार 'दबंग टूर' घेऊन आले आहेत. अमेरिकेप्रमाणेच कॅनडामध्येही ही टूर दाखल होणार आहे.
रेस 3 च्या बॉक्सऑफिसवरील सुपरहीट कामगिरीनंतर आता सलमान खान 'भारत' या बहुप्रतिक्षित सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत प्रियंका चोप्रा, दिशा पटणी झळकणार आहेत.