तुझ्या भोळ्या नवऱ्याची फसवणूक का केलीस? नेटकऱ्याच्या प्रश्नावर समांथाचं सडेतोड उत्तर

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यानं नवऱ्याची फसवणूक का केली हा सवाल करताच दिलं सडेतोड उत्तर

दिक्षा पाटील | Updated: Apr 11, 2024, 11:51 AM IST
तुझ्या भोळ्या नवऱ्याची फसवणूक का केलीस? नेटकऱ्याच्या प्रश्नावर समांथाचं सडेतोड उत्तर title=
(Photo Credit : Social Media)

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. समांथा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. समांथा ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र, त्यातही सगळ्यात जास्त चर्चा ही तिच्या खासगी आयुष्याची असते. समांथाला अनेकदा तिच्या घटस्फोटावरून ट्रोल करण्यात येतं. दरम्यान, आता पुन्हा समांथाला यावरुन ट्रोल करण्यात आल्याचं पाहता तिनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका पॉडकास्टमधील आहे. यात समांथा तिच्या मॉर्निंग रुटिन म्हणजेच सकाळी ती किती वाजता उठते आणि ती काय काय करते याविषयी सांगताना दिसते. यावर इतर नेटकरी त्यांच्या काही शंका दूर करण्यासाठी काही प्रश्न विचारताना दिसले तर दुसरीकडे समांथाला ट्रोल करत एका नेटकऱ्यानं थेट तिच्या घटस्फोटावर प्रश्न विचारला... हा नेटकरी म्हणाला, तू तुझ्या भोळ्या आणि इनोसन्ट नवऱ्याची फसवणूक का केली ते सांग? त्यावर सडेतोड उत्तर देत समांथा म्हणाली, माफी आहे, पण ही प्रॅक्टिस तुझी कधीच मदत करणार नाही... तुला याहून काही चांगल्याची गरज आहे. तुझ्यासोबत सगळं चांगलं होओ ही आशा. 

Samantha Ruth Prabhu slams troller over asking question on why she cheated on husband

तर या व्हिडीओत समांथानं सांगितलं की ती सकाळी 5.30 वाजता उठते. उठल्यानंतर मी लगेच जर्नल लिहिते... म्हणजे माझा आजचा दिवस चांगला जाईल यासाठी मी लिहत असते. त्यानंतर ती 5 मिनिटं उन्हात बसते त्यानंत ती ब्रिथिंग एक्सरसाईज करते. (विम हॉफ) ही ब्रिथिंग टेकनिक मी फॉलो करते. त्यानंतर 25 मिनिटं मेडिटेशन म्हणजेच ध्यान करते. त्यात मी ईशा क्रिया फॉलो करते. काही महिन्यांपासून मी टॅपिंग ही एक एक्सरसाईज सुरु केली आहे. टॅपिंग ही एक अशी पद्धत आहे ज्यात तुम्ही तुमची एनर्जी बॅलेन्स करु शकतात आणि ती तुम्हाला असलेला त्रास दूर होण्यास मदत होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'तब्बूची सुंदरता घालवलीत...', फोटोशूटमधील अभिनेत्रीचा मेकअप पाहून नेटकरी संतप्त

दरम्यान, समांथानं एका मुलाखतीत नागा चैतन्यसोबतच्या तिच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं होतं. ती म्हणाली होती की तिच्यावर त्यांच्या घटस्फोटाचा खूप वाईट परिणाम झाला होता. पण आता ती आनंदी आयुष्य जगत आहे.