सत्यमेव जयते सिनेमातील 'दिलबार' गाणं रिलीज

पाहा अफलातून गाणं 

सत्यमेव जयते सिनेमातील 'दिलबार' गाणं रिलीज title=

मुंबई : 'जाने कहां से आई है', 'राख' आणि 'मस्तीजादे' सारखे सिनेमे देणारा यंग दिग्दर्शक मिलाप मिलन झावेरी. आता या दिग्दर्शकाचा 'सत्यमेव जयते' हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनादिवशी प्रदर्शित होत आहे. या सिनेमात जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री आयशा शर्मा सारखे कलाकार लीड रोलमध्ये आहे. काही वेळापूर्वीच याचा ट्रेलर समोर आला आहे. ज्यामध्ये जॉन आणि मनोज अॅक्शन करताना दिसत आहे. सिनेमाचा ट्रेलर यूट्यूबवर धमाल करत असताना आता याचं 'दिलबर' हे गाणं समोर आलेलं आहे. 

'दिलबर' हे गाणं तुम्ही या अगोदर देखील ऐकलं असेल. 1999 मध्ये 'सिर्फ तुम' या सिनेमात हे गाणं अगोदर आपण ऐकलं आहे. आता हे गाणं सत्यमेव जयते करता पुन्हा एकदा रिक्रिएट केलं आहे. या गाण्यावर अगोदर सुष्मिता सेनचा डान्स चर्चेत होता. आता नोरा फतेही या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. 

20 वर्ष या जुन्या गाण्याचा अंदाज सत्यमेव जयतेमध्ये बदलला आहे. आताच्या गाण्याला अरेबिक स्टाइलमध्ये रिक्रिएट केल आहे. जुनं गाणं अल्का याग्निक आणि विनोद राठोड यांनी गायलं असून आताचं गाणं हे नेहा कक्कर आणि धवनी भानुषालीने गायलं आहे.