'कित्येक रात्री रात्री डान्सबारमध्ये घालवाव्या लागल्या' अभिनेत्री अदा शर्माचा धक्कादायक खुलासा

सुनील ग्रोवरची वेब सिरीज 'सनफ्लॉवर 2' 1 मार्चला 'झी 5'वर रिलीज झाली आहे. ज्यामध्ये अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. 

Updated: Mar 26, 2024, 07:54 PM IST
'कित्येक रात्री रात्री डान्सबारमध्ये घालवाव्या लागल्या' अभिनेत्री अदा शर्माचा धक्कादायक खुलासा  title=

मुंबई : बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांची अभिनेत्री अदा शर्मा ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिला सोशल मीडियावर सक्रिय राहणे आवडते. कमांडो गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अदा शर्मा कधी लेटेस्ट फोटोशूट तर कधी डान्स व्हिडीओ पोस्ट करून चर्चेत असते. याशिवाय अभिनेत्री फिटनेस व्हिडिओ आणि मजेदार व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करते. मात्र नुकतीच अदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

सुनील ग्रोवरची वेब सिरीज 'सनफ्लॉवर 2' 1 मार्चला 'झी 5'वर रिलीज झाली आहे. ही डार्क ह्यूमर सिरीजला प्रेक्षकांचा तुफान रिस्पॉन्स मिळत आहे. तर सिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये एक्ट्रेस अदा शर्माची एन्ट्री झाली आहे. सिरीजमध्ये अभिनेत्री रोजी मेहताची भूमिका साकारत आहे. जी एक बार डान्सर असते. 

अदा शर्माला डान्स बारमध्ये घालवाव्या लागल्या कित्येक रात्री 
या दरम्यान अभिनेत्रीने 'सनफ्लॉवर 2'मध्ये आपल्या भूमिकेला घेवून मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, तिने आपल्या भूमिकेसाठी एका डान्स बारमध्ये कित्येक रात्री घालवल्या आहेत. कारण तिला स्क्रीनवर प्रभावकारी दिसायचं होतं. अभिनेत्री अदा शर्माने सांगितलं की, ''मला प्रभावी दिसायचं होतं. हे फक्त यासाठी नाहीये की,  तुम्ही कधी डान्स करत आहात, तर तुम्ही कसे बसता आणि कसे उभे राहता आणि तुम्ही परफॉर्म करत नसताना तुम्ही तुमच्या शरीरासोबत किती आरामात आहात याविषयी होतं."

अभिनेत्रीने केला खुलासा
अभिनेत्रीने पुढे सांगितलं की,  ती कधी-कधी पहाटे पाच वाजेपर्यंत डान्सबारमध्येच लक्ष घालायची. अभिनेत्री पुढे म्हणाली, “त्या सगळ्या इतक्या छान होत्या की, त्यांनी मला बारमध्ये राहण्याची आणि इतर गोष्टी पाहण्याची परवानगी दिली. ग्राहकांशी बोलताना मी त्यांचा आत्मविश्वास पाहण्याचा प्रयत्न केला. मी रात्री ९ वाजता जायचे, कधी कधी पहाटे ४ ते ५ पर्यंत तिथे थांबायचे.'

'सनफ्लॉवर 2'  एक मर्डर मिस्ट्री सीरीज आहे. ज्यामध्ये सुनी ग्रोवर मर्डरच्या प्राइम सस्पेक्ट आहे. ती एका हत्येच्या रहस्यात अडकतो. ज्यामध्ये सुनील ग्रोवर आणि मुकुल चड्ढा मुख्य भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे सनफ्लॉवरच्या पहिल्या सीझनबद्दल बोलायचं झालं तर प्रेक्षकांनी या सिरीजला खूप पसंती दिली होती. , या वेब सिरीजद्वारे सुनील ग्रोव्हरने देखील ओटीटी पदार्पण केले आहे.