प्रियंकाच्या एक्स शाहिद कपूरने निक जोनसला दिला सल्ला

काय दिला शाहिदने सल्ला 

प्रियंकाच्या एक्स शाहिद कपूरने निक जोनसला दिला सल्ला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि देसी गर्ल प्रियंका चोप्रा यांच्या लिंकअप्सच्या चर्चा याआधी भरपूर झाल्या. दोघांनी 'कमीने' या सिनेमात एकत्र काम देखील केले होते. मात्र, काही काळाने या दोघांच्या अफेअरच्या चर्चा आपोआप कमी होऊन बंद झाल्या. 

प्रियंकाने 2018 वर्ष सरतानाच गायक निक जोनससोबत लग्न केलं. तर शाहिद कपूर सध्या मीरा राजपूतसोबत आपल्या दोन्ही मुलांसोबत फॅमिली लाइफ एन्जॉय करत आहे. प्रियंका शाहिदची कोस्टार असल्यामुळे त्याला प्रियंका चोप्राबद्दल प्रश्नांची विचारणा होणार यात काहीच नवीन नाही. 'कॉफि विथ करण' च्या सहाव्या सिझनच्या एका प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, शाहिद कपूर आणि त्याचा लहान भाऊ ईशान खट्टर आले आहेत. 

या प्रोमोत करण शाहिदला प्रियंका चोप्राच्या नवऱ्याला निकला एक सल्ला देण्याबाबत सांगतो. यावर निकला शाहिदने सल्ला दिला आहे की, 'निक, कधीच दिलेल्या शब्दापासून मागे हटू नकोस... तू खऱ्या देसी गर्लसोबत आहेस'

मीडियामध्ये खूप आधी अशी चर्चा होती की, 'कमीने' सिनेमाच्या शुटिंगवेळी हे दोघं एकमेकांना डेट करत होते. पण दोघांनी देखील या गोष्टीवर कधीच उत्तर दिलं नाही. दोघं वेगवेगळे झाले आणि पुढे त्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष दिलं.

तसेच शाहिद कपूर या भागात ईशानसोबत आला आहे. मग ईशानला करण जान्हवी कपूरबद्दल न विचारता कसा राहिल. पुन्हा एकदा ईशानला जान्हवी आणि त्याचं काही सुरू आहे का? असा प्रश्न करण जोहरने विचारला आहे.