शाहरुख सोबत हॉटसीन देण्यापूर्वी काजोलनं केलं 'हे' मनपसंत काम, नक्की काय आहे तो किस्सा?

करण अर्जुन हा 90 च्या दशकातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक मानला जातो. 

Updated: Sep 25, 2021, 10:07 PM IST
  शाहरुख सोबत हॉटसीन देण्यापूर्वी काजोलनं केलं 'हे' मनपसंत काम, नक्की काय आहे तो किस्सा?

मुंबई : करण अर्जुन हा 90 च्या दशकातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक मानला जातो. यात शाहरुख खान, काजोल, सलमान खान आणि ममता कुलकर्णीसारखे कलाकार दिसले होते. हा चित्रपट होता ज्याने काजोल आणि शाहरुखची ऑन-स्क्रीन ईमेजला मजबूत बनवलं होतं.

शाहरुख आणि काजोलची केमिस्ट्री पडद्यावर छान दिसली असेल पण त्यांच्यासाठी ते सोपं नव्हतं. एका जुन्या मुलाखतीत दोघांनी सिनेमातलं 'जात हूं जलदी है क्या' या गाण्याच्या बिहाइंड द शूटिंग मागच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. खरंतर या गाण्याला हॉट बनवण्याचा हेतू होता. मात्र या गाण्याला असामान्य डान्सच्या स्टेपसाठी आठवलं जातं.

शिकवल्या जात होत्या सेमी-वल्‍गर मोमेंट्स
यापूर्वीच्या एका मुलाखतीत करण जोहरने सांगिंतलं की, काजोल सेटवर कशी 'डिस्टर्ब' होती. करण म्हणाला, 'चिन्नी प्रकाश आणि रेखा प्रकाश तिला अॅक्रोबॅटिक आणि सेमी-वल्गर डान्स स्टेप्स शिकवत होते.' या दरम्यान, शाहरुखने गमतीने सांगितलें की, तो डान्स बरोबर आहे. यानंतर करण पुढे म्हणाला, 'पण काजोल चिडली. ती बसली होती आणि रागाने बघत होती.

विचित्र एक्सप्रेशन द्यायचे होते
शाहरुख पुढे म्हणाला, 'शूट गवताजवळ होत होतं आणि काही हॉट एक्सप्रेशन द्यावे लागणार होते. काजोलला याचा त्रास होत होता. माझ्यासाठी ते सोपं होतं. हे खूप मजेदार होतं कारण काजोल सतत सांगत होती की, तिला या सगळ्याचा अनुभव नाही. यामुळे तिला ते खूप विचित्र वाटत होतं. मी मदत करण्याचा प्रयत्न करत होतो पण ते खरोखर विचित्र होतं.'