शाहरुखचा 'हा' अफलातून डान्स व्हिडीओ तुम्ही पाहिला का ?

बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खानचा २ नोव्हेंबरला ५२  वा वाढदिवस होता. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 4, 2017, 12:29 PM IST
शाहरुखचा 'हा' अफलातून डान्स व्हिडीओ तुम्ही पाहिला का ? title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खानचा २ नोव्हेंबरला ५२  वा वाढदिवस होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी शाहरुखच्या चाहत्यांनी 'मन्नत' बाहेर गर्दी केली. त्यानंतर शाहरुखचा इजा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात शाहरुख 'फॅन' या त्याच्या चित्रपटातील 'जबरा फॅन' या गाण्यावर डान्स करत आहे. शाहरुखचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन क्लबने शेअर केला. या शाहरुख अत्यंत आनंद घेत, मस्ती करत डान्स करताना दिसत आहे. 

शाहरुखचा हा डान्स चालू असताना त्याच्या चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिसादाची झलक व्हिडिओतून पाहायला मिळते. हा व्हिडीओ एका हॉटेलमधील असून चाहत्यांच्या आग्रहाखातीर शाहरूखने हा डान्स केला आहे. 

शाहरुखने आपला वाढदिवस अत्यंत धुमधडाक्यात साजरा केला. वाढदिवसाची पार्टी त्याच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर देण्यात आली. पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. या पार्टीत मस्ती करतानाचे फोटोज देखील सेलिब्रिटींनी शेअर केले. जे चाहत्यांच्या पसंतीस उतरले. 
पाहायला मिळते.