शमिताच्या भावाची Bigg Boss 15 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; शेट्टी सिस्टर्सचा हा भाऊ आहे तरी कोण?

Bigg Boss 15 शमिताच्या भावाची वाइल्ड कार्ड एन्ट्री, कोणाला करणार सपोर्ट? 

Updated: Oct 22, 2021, 09:30 AM IST
शमिताच्या भावाची Bigg Boss 15 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; शेट्टी सिस्टर्सचा हा भाऊ आहे तरी कोण?

मुंबई : टीव्ही विश्वातील सर्वात वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. सध्या बिग बॉस 15ची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. या घरात मैत्री आणि शत्रूत्वाचं दर्शन घडतं.  त्यामुळे शोच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता बिग बॉसचं यंदाचं सीझन महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलं आहे. कोण कोणाच्या विरोधात आहे, कसे एकमेकांविरोधात कट रचले जात आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शोमध्ये सर्वात जास्त चर्चीत चेहरा आहे तो म्हणजे अभिनेत्री शमिता शेट्टी.

आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शोमध्ये शमिताला सपोर्ट करण्यासाठी तिच्या भावाची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. शमिताच्या भावाच्या एन्ट्रीनंतर संपूर्ण गेम पलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शमिताच्या भावाला माहित आहे आपल्य बहिणीच्या विरोधातच्या बिग बॉसच्या घरात कोण आहे. त्यामुळे आता शोला वेगळ वळण लागणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajiv Adatia (@rajivadatia)

कोण आहे शेट्टी सिस्टर्सचा भाऊ?
शिल्पा आणि शमिता शेट्टीच्या भावाचं नाव आहे राजीव अदतिया.  राजीव शिल्पा आणि शमिताचा मानलेला भाऊ आहे. दोघीही राजीवला राखी बांधतात. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी राजीव अनेक अंतरराष्ट्रीय ब्रांडचा चेहरा बनला. तो एक निर्माता, उद्योगपती आणि प्रसिद्ध मोटिवेशन स्पिकर आहे. 

एवढंच नाही तर राजीव सोशल मीडियावर देखील कायम ऍक्टिव्ह असतो. त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर अनेक सेलिब्रिटींसोबत फोटो आहेत. दरम्यान शो आणि राजीवबद्दल सांगायचं झालं तर तो या वीकेंडला शोमध्ये प्रवेश करू शकतो. शोमध्ये पोहोचल्यानंतर तो त्याच्या बहिणीला म्हणजे शमिताला सपोर्ट करताना दिसणार आहे.