शिल्पाच्या मुंडन मागचं अखेर कारण समोर; पती आणि हेअरकटचं खास कनेक्शन

पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या पतीसाठी शिल्पाने उचललं मोठं पाऊल

Updated: Oct 28, 2021, 02:42 PM IST
शिल्पाच्या मुंडन मागचं अखेर कारण समोर; पती आणि हेअरकटचं खास कनेक्शन title=

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणी आल्या. पती राज कुंद्रा पॉर्न प्रोडक्शन प्रकरणी तुरुंगात गेल्यानंतर शिल्पा पूर्णपणे खचली होती.  पती पॉर्न प्रकरणात अडकल्यानंतर ती कित्येक दिवस सोशल मीडियापासून दूर होती. एवढंच नाही तर शिल्पा शोच्या चित्रीकरणासाठी देखील पोहोचत नव्हती. दरम्यान तब्बल दोन महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला. पतीला जामीन मिळण्याच्या काही दिवस आधी शिल्पा मैत्रिणीसोबत वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेली होती. 

काही दिवसांपूर्वी शिल्पाने एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये ती हेअरकट करताना दिसली.  शिल्पा शेट्टीने केलेला हेअरकट हा कोणत्याही फॅशनमुळे नाही तर शिल्पाने पतीसाठी मागितलेल्या नवसामुळे केला आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, शिल्पा शेट्टीने वैष्णोदेवीला जाऊन नवस मागितला होता. जर तिचा पती राज कुंद्राला पॉर्न प्रोडक्शन प्रकरणात जामीन मिळाला तर ती आपले अर्धे डोके मुंडन करेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अलीकडेच शिल्पा शेट्टीने तिचा हेअरकट करतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये शिल्पा जिममध्ये केस बांधताना दिसली होती, ज्यामध्ये तिचा हेअरकटही दिसला. तेव्हा तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.