मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला राज कुंद्रा या प्रकरणात खूप त्रास सहन करावा लागला आहे. मात्र, आता शिल्पा हळूहळू सामान्य आयुष्यात परत येत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गणेश चतुर्थी 2021च्या निमित्ताने शिल्पाने तिच्या घरी 'गणपती बाप्पा' आणला आहे. पण यावेळी घरात राज कुंद्रा आणि बहीण शमिता शेट्टीची कमतरता आहे. शिल्पाचे चाहतेही तिला पती राज कुंद्राबद्दल विचारत आहेत. आम्ही तुम्हाला सांगू, राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात कोठडीत आहे.
शिल्पा शेट्टी गणेश चतुर्थीला दरवर्षी गणपती बाप्पाचं स्वागत करते. गणपतीच्या स्वागतासाठी शिल्पा कोणतीही कसर सोडत नाही. काही वेळापूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केली आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिल्पा तिचा मुलगा विवान आणि मुलगी समिशासोबत दिसत आहे. शिल्पाच्या या 'पिक्चर परफेक्ट' पिक्चरमध्ये तिचा पती राज कुंद्रा गायब आहे. साहजिकच यावेळी अभिनेत्री तिच्या पतीची खूप आठवण काढेल. फोटोत, अभिनेत्री तिच्या मुलांसोबत खूप मजा करताना दिसत आहे. मुलं देखील तिच्या आईबरोबर खूप आनंदी दिसत आहेत. पण शिल्पाचे चाहते तिचा मात्र पती राज कुंद्राला मिस करत आहेत, म्हणूनच तिचे चाहते राज यांच्याबद्दल कमेंट करत आहेत आणि विचारत आहेत.
एका युजर्सने शिल्पा शेट्टीच्या पोस्टवर कमेंट केली आणि लिहिलं, 'बबुआ के पापा नहीं दिख रहे हैं शिल्पा आंटी' तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, 'मॅडम राज कुंद्रा कुठे आहेत.' अभिनेत्रीने पोस्ट केली आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ओम गण गणपतये नमो नमः , श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया.'' तिच्या पतीच्या अटकेनंतर तिनं काही आठवड्यांसाठी कामातून ब्रेक घेतला. अलीकडेच शिल्पा पुन्हा कामाला जावू लागली आहे. सुपर डान्सरवर तिचे सर्वांनी जोरदार स्वागत केलं, ते पाहून ती भावूक झाली.