वाह...सलमान...कष्टकऱ्यांचा एवढा मोठा भार सलमान खान उचलणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाची परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. 

Updated: May 8, 2021, 07:07 PM IST
वाह...सलमान...कष्टकऱ्यांचा एवढा मोठा भार सलमान खान उचलणार

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाची परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे सरकारने नियम अधिक कठोर केले आहेत. अशात हातावर पोट असणाऱ्यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.  अशा परिस्थितीत  सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. काहींनी  ऑक्सिजनचा पुरवठा केला, तर काही निधी जमा करण्याच्या  प्रयत्नात आहेत. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या रूग्णांचा प्रवास तर खडतर आहेच, पण कष्टकऱ्यांना देखील मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. 

अशात हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांच्या मदतीला बॉलिवूडचा गॉडफादर म्हणजे अभिनेता सलमान खान धावून आला आहे. सलमान मजुरांच्या खात्यात पैसे पाठवणार आहे. सलमान पुन्हा एकदा मेकअप मेन, स्पॉटबॉय अशा 25 हजार मजुरांची मदत करणार आहे. ज्यामुळे संकटकाळी मजुरांना काही प्रमाणात मदत होणार आहे. 

याआधी देखील सलमानने FWICEच्या संलग्न असलेल्या मजुरांना मदत केली होती. आता सलमान 25 हजार मजुरांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रूपये ट्रांसफर करणार आहे. शिवाय सलमानचा आगामी 'राधे' चित्रपटाला मिळालेला पैसा देखील तो कोरोना काळात दान करणार आहे.