श्रीदेवीचा शेवटच्या क्षणाचा फोटो व्हायरल

श्रीदेवीच्या निधनानंतर तिची जाऊ म्हणजे अनिल कपूरची पत्नी सुनिता कपूरचे भरपूर फोटो व्हायरल झाले. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 12, 2018, 03:40 PM IST
श्रीदेवीचा शेवटच्या क्षणाचा फोटो व्हायरल  title=

मुंबई : श्रीदेवीच्या निधनानंतर तिची जाऊ म्हणजे अनिल कपूरची पत्नी सुनिता कपूरचे भरपूर फोटो व्हायरल झाले. 

श्रीदेवीच्या निधनानंतर कपूर कुटुंबियांवर आणि खास करून जान्हवी आणि खुशीवर मोठा आघात झाला. यावेळी त्यांना सावरण्याचं काम सुनिता कपूरने केला आहे. आता  श्रीदेवीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत सुनिता आणि श्रीदेवी यांचा एकत्र फोटो आहे. 

हा फोटो अनिल कपूरचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नातील आहे. याच लग्न समारंभाच्या दोन दिवसांनंतर श्रीदेवी यांचे दुबई येथे अपघाती निधन झाले. त्यामुळे हा फोटो श्रीदेवी यांच्या अखेरच्या क्षणाचा असल्याचे बोलले जात आहे. या फोटोमध्ये दोघीही ट्रेडिशनल ड्रेसमध्ये पोज देताना बघावयास मिळत आहेत. फॅमिली वेडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या या दोघींनी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

श्रीदेवी यांनी सिल्व्हर काठ असलेला पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता तर सुनीताने कुंदन ज्वेलरीसह डार्क पिंक सूट घातला होता.