SSR Case : सुशांतच्या बहिणीचं मितू सिंहच ट्विट व्हायरल

व्हिडिओ शेअर करून व्यक्त केल्या भावना 

Updated: Aug 28, 2020, 06:23 PM IST
SSR Case : सुशांतच्या बहिणीचं मितू सिंहच ट्विट व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला दोन महिने उलटून गेले आहेत. या घटनेचा तपास आता CBI करत आहे. असं असताना मितू सिंह यांनी भावूक होऊन आपल्या भावाचा म्हणजे सुशांतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याच प्रमाणे त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओत इन्साफ ही एक सवाल है... असं म्हटलं आहे. 

तसेच शुक्रवारी तिने भावूक होत आपल्या भावाची आठवण काढत एक पोस्ट देखील शेअर केली. यामध्ये तिने आठवण येतेय... सोलमेट म्हणत तू कायमच माझ्या हृदयात राहशील. तुझ्याबद्दलच्या भावना मी शब्दात सांगू शकत नाही. 

सुशांतच्या बहिणीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तीने सुशांतला न्याय मिळावा या उद्देशाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीचे दोन मोबाईल फोोन क्लोन करण्यात आले आहेत. मोबाईलचा डिजिटल डेटा तपासल्यानंतर रिया, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, शोविक चक्रवर्ती आणि जया यांच्यात बरीच व्हॉट्सऍप चॅट समोर आली आहेत. सॅम्युअल मिरांडा आणि रिया चक्रवर्ती सुशांतच्या पैशांचा वापर स्वत:च्या वैयक्तिक खर्चासाठी करत असल्याचं व्हॉट्सऍप चॅटच्या तपासात समोर येत आहे.