Success Story: बॉलिवूडमध्ये स्वत:च अस्तित्व निर्माण करण्यासाठी देशभरातील आणि काही वेळा तर देशाबाहेरील अनेकजण प्रयत्न करत असतात. त्यापैकी काहींना इतकं मोठ यश मिळतं की ते चित्रपटसृष्टीमध्ये अजरामर होतात तर काहीजण हे केवळ त्या सुपरस्टार्सचे साइड हिरो म्हणूनच राहतात. बॉलिवूडमध्ये असाच एक अभिनेता आहे, जो आयएएस अधिकारी बनण्याची तयारी करत होता पण बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि साइड हिरो बनून राहिला.
'कठपुतली' (Cuttputlli) या सिनेमात अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता म्हणजे चंद्रचूर सिंह (Chandrachur Singh). अभिनेता चंद्रचूर सिंहचा जन्म 11 ऑक्टोबर 1968 ला अलिगडला झाला. शाळा आणि कॉलेजचं शिक्षण घेतल्यानंतर चंद्रचूरने संगीत शिक्षण म्हणून दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमध्ये संगीत शिकवण्याची सुरुवात केली. पुढे जाऊन, तो टून स्कूलमध्ये इतिहास विषयाचा शिक्षक बनला. इतिहासाचं शिक्षण देत असताना त्याने आयएएस बनण्याची तयारी सुरु केली.
अभिनेता बनण्याआधी चंद्रचूर सिंहला आयएसएस अधिकारी व्हायचं होतं. त्यासाठी चंद्रचूरने यूपीएससी परीक्षेची तयारी देखील सुरु केली होती. अभिनेता बनण्यासाठी 1988 ला मुंबईत आलेल्या चंद्रचूरने, 1990 मध्ये एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली पण त्या चित्रपटाचं शुटिंग अर्ध्यावरचं थांबलं. त्यानंतर पुढच्या 5 वर्षांमध्ये एकाही चित्रपटात काम नाही मिळालं.
बॉलिवूडचा महानायक अशी ओळख असलेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या पत्नी बॉलिबूड अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी 'तेरे मेरे सपने' (Tere Mere Sapne) या चित्रपटाच्या स्क्रीन टेस्टसाठी बोलवलं आणि चंद्रचूरचं सलेक्शनसुद्धा केलं. ‘तेरे मेरे सपने’ चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केलेल्या चंद्रचूरने 'माचीस' या चित्रपटात देखील काम केलं. त्याचा अभिनय इतका प्रभावी ठरला की, त्याला या कामासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण (Filmfair Award) पुरस्कार मिळाला. 'तेरे मेरे सपने' (Tere Mere Sapne) चित्रपटाची निर्मिती अमिताभ बच्चन यांच्या प्रोडक्शन हाऊसने केली होती.
'माचीस' चित्रपटातून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे चंद्रचूर सिंहने 'दाग: द फायर, जोश आणि आम्दनी अठ्ठनी खर्चा रुपैया' यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. चंद्रचूर सिंहचा 2001 ला अपघात झाला आणि तो चित्रपटसृष्टीतून बाहेर पडला. तब्बल 12 वर्षानंतर तो चित्रपटांत पुन्हा दिसला.