सनीचा जलवा आता साऊथमध्येही...

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी हिचे फक्त नावच पुरेसे आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 28, 2017, 10:41 AM IST
सनीचा जलवा आता साऊथमध्येही... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी हिचे फक्त नावच पुरेसे आहे. त्याचबरोबर तिचे आयटम सॉन्ग चांगलेच गाजतात. तिच्या चित्रपटांबद्दल तर चाहते अधिकच उत्सुक असतात. अलिकडेच सनीचा तेरा इंतजार हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र तो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. पण सनी आता बॉलिवूडबरोबरच साऊथमध्ये ही आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच खूद्द सनीनेच ही माहिती सोशल मीडियावरून आपल्या फॅन्सना दिली.

पोस्टर प्रदर्शित

तिच्या तमिळ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे नाव ‘वीरमादेवी’आहे. सोशल मीडियावर देखील #Veeramadevi ट्रेंड होत आहेत. देशभक्तीवर आधारित हा चित्रपट असून यात सनी ‘वीरमादेवी’ची भुमिका साकारत आहे. या चित्रपटाबद्दल सनी अत्यंत उत्सुक आहे.

व्हिडिओ शेअर केला

प्रदर्शित झालेल्या पोस्टरबद्दल सनी तमिळमध्ये बोलत आहे. तो व्हिडिओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

हा चित्रपट तमिळसोबतच इतर भाषांमध्ये देखील प्रदर्शित होईल.