'Papa Miss You', असं का म्हणाला सनी देओल?; अभिनेत्याची पोस्ट पाहून धर्मेंद्र यांचे चाहते चिंतीत

बॉलिवूडमधील देओल कुटुंब नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल हा देखील त्याच्या अभिनयामुळे चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असतो. मात्र, आता त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 27, 2024, 12:51 PM IST
'Papa Miss You', असं का म्हणाला सनी देओल?; अभिनेत्याची पोस्ट पाहून धर्मेंद्र यांचे चाहते चिंतीत

Sunny Deol : दोन वेळा लग्न होऊन देखील धर्मेंद्र यांचे दोन्ही कुटुंबांशी चांगले संबंध आहेत. पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याशी देखील त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत. अनेकदा ते सनी देओल आणि बॉबी देओलसोबत हँग आउट करताना दिसतात. सनी देओल धर्मेंद्र यांच्याशी खूप जवळचे नाते आहे. सनी देओल नेहमी सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्याबद्दल काही ना काही शेअर करत असतो. दोघांची प्रेमळ केमिस्ट्री देखील चाहत्यांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. 

Add Zee News as a Preferred Source

दरम्यान, आपल्या कामातून वेळ काढून सनी देओल वडील आणि कुटुंबासह मैदानात फिरायला गेला होता. अशातच आता सनी देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. 

सनी देओलच्या नवीन पोस्टमुळे वाढली चिंता 

नुकतीच सनी देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल खूप भावूक पोस्ट केली आहे. अनेक वेळा सनी देओलने त्याच्या मुलाखतीत काही घटना सांगितल्या आहेत. ज्यामध्ये धर्मेंद्र यांनी त्याला फटकारले होते. त्यामधूनच त्याने धडा घेतला होता. परंतु सध्या अभिनेता सनी देओलने शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सनी देओलने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, 'पापा, मी तुम्हाला खूप मिस करत आहे'. यासोबतच त्याने हार्ट इमोजी देखील तयार केली आहे. मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. सनी देओलच्या या पोस्टवर ईशा देओलनेही कमेंट केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'धर्मेंद्र यांच्यासारखा कोणी नाही'

अभिनेता सनी देओलने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. ज्यामध्ये एका चाहत्यांने म्हटलं आहे की, धर्मेंद्र यांच्यासारखा दुसरा कोणीच नाही. तर दुसऱ्या एका चाहत्यांने कमेंट करून सनी देओल आणि बॉबी देओल यांना खूप खूप प्रेम अशी कमेंट केली आहे. तर काही चाहत्यांनी आई-वडिलांशिवाय जग अपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. 

सनी देओलचा आगामी चित्रपट

अभिनेता सनी देओल हा गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे. त्याच्या चित्रपटांनी चाहत्यांना देखील वेड लावलं आहे. सनी देओलच्या 'गदर' चित्रपटातील अभिनय कोणीच विसरू शकत नाही. या चित्रपटाला चाहत्यांकडून देखील प्रचंड प्रेम मिळाले. त्यासोबतच 'गदर 2' चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. सध्या तो 'बॉर्डर 2' या चित्रपटात दिसणार आहे. चाहते देखील सनी देओलच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More