टीव्ही अभिनेत्रीचं वारंवार लैंगिक शोषण; ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात असे प्रसंग अनेक वेळा घडत असतात. 

Updated: Mar 6, 2021, 02:13 PM IST
टीव्ही अभिनेत्रीचं वारंवार लैंगिक शोषण; ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल  title=

मुंबई : एका टीव्ही अभिनेत्रीला लग्नाचं अमिष दाखवून तिचं वारंवार लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. याबद्दल अभिनेत्रीने ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्रीने असे आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीसीच्या अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करत तपास सुरू केला आहे.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात असे प्रसंग अनेक वेळा घडत असतात. झगमगत्या विश्वात लग्नाचं आमिष दाखून बलात्कार केल्याच्या अनेक घटना घडत असतात. शिवाय अशा अनेक तक्रारी पोलिसात दाखल होत असतात.