'उद्धव ठाकरेंना कायद्याची अधिक माहिती नाही'

सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांचं वक्तव्य  

Updated: Aug 2, 2020, 04:55 PM IST
'उद्धव ठाकरेंना कायद्याची अधिक माहिती नाही' title=

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कायद्या संबंधी अधिक माहिती नाही असं वक्तव्य सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी केलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये संदर्भात प्रत्येक दिवशी नवनवीन होत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देखील याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. ज्या कोणाकडे सुशांतच्या केससंदर्भात सर्व पुरावे असतील त्यांनी कृपया समोर यावं असं आवाहन त्यांनी केलं होतं.

यावर सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी ठाकरे यांना कायद्या संबंधी अधिक माहिती नाही असं वक्तव्य केलं.  'सुशांतची केस एक क्रिमिनल केस आहे. त्यामुळे प्रॉसिक्यूशनची जबाबदारी सत्य बाहेर आणणं आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी फार विचित्र प्रतिक्रिया दिली असल्याचं वक्तव्य त्यांनी विकास सिंह यांनी केलं. 

त्यामुळे ठाकरे यांना  कायद्याचं फारसं ज्ञान नाही असं याठिकाणी स्पष्ट होत आहे म्हणत मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत नाहीत हे काम आता बिहार पोलीस पूर्ण करतील असं देखील  विकास सिंह म्हणाले. 

दरम्यान सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे आता या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे. मंगळवारी रात्री सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांकडून याप्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे.