उरी फेम विकी कौशलसह 'ही' अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

अक्षय कुमारपाठोपाठ मनोरंजन विश्वातील दोन स्टार कलाकार कोरोनाच्या विळख्यात

Updated: Apr 5, 2021, 12:28 PM IST
उरी फेम विकी कौशलसह 'ही' अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह title=

मुंबई: क्रिकेट विश्वापाठोपाठ आता मनोरंजन विश्वावरही कोरोनाचं सावट अधिक गडद होताना पाहायला मिळत आहे. अभिनेता अक्षय कुमारनंतर आता उरी फेम विकी कौशलला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. विकी कौशल सध्या होम क्वारंटाइन असल्याची माहिती मिळाली आहे.

अभिनेता अक्षय कुमारची प्रकृती थोडी बिघडल्यानं त्याला आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर अभिनेता विकी कौशलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन विकी कौशल याने केलं आहे. त्याच सोबत प्रसिद्ध अभिनेत्रीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. 

पती-पत्नी और वो सिनेमा असो किंवा लस्ट स्टोरी वेब सीरिज भूमी पेडणेकरच्या भूमिका सर्वांनाच आवडतात. भूमीचा कोरोना रिपोर्टही नुकताच पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या भूमीनं स्वत:ला होम क्वारंटाइन केल्याची माहिती मिळाली आहे.