राज ठाकरेंच्या मुलीचं बॉलीवूडमध्ये पदार्पण

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलगी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Updated: Sep 3, 2017, 08:34 PM IST
राज ठाकरेंच्या मुलीचं बॉलीवूडमध्ये पदार्पण title=

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलगी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जुडवा-२ हा उर्वशीचा पहिला चित्रपट असेल. जुडवा-२मध्ये उर्वशी अभिनय करणार नाही तर या चित्रपटाची ती सहाय्यक दिग्दर्शक असणार आहे.

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून उर्वशी जेव्हा सेटवर यायची तेव्हा तिच्याबाबत आणि ती कोणत्या परिवारातून आली आहे, हे कोणालाच माहिती नव्हतं, अशी प्रतिक्रिया चित्रपटाच्या क्रूनं दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनीही उर्वशीच्या कामाचं कौतुक केलं आहे. जुडवा-२ नंतर उर्वशी साजिद नाडियाडवालासोबतही काम करणार असल्याचं बोललं जात आहे.

जुडवा-२ हा चित्रपट सलमान खानच्या जुडवा चित्रपटाचा रिमेक आहे. जुडवाच्या या सिक्वलमध्ये वरुण धवन डबल रोलमध्ये दिसणार आहे. वरुणसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असतील. २९ सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.