Anushka-Virat ने दिलं जेवणाचं आमंत्रण, तरीही कतरिना-विकी मात्र त्यांच्यासोबत जेवले नाहीत; नेमकं काय झालं?

Anushka Sharma नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कतरिना आणि विकीनं तिला आणि विराटला रात्री जेवणला बोलावल्यानंतर काय केलं याचा खुलासा केला आहे. यासोबत तिचं कतरिना आणि शाहरुख खानसोबत कसं नातं आहे. शाहरुख तिला त्याच्या घरी असलेल्या पार्ट्यांमध्ये आमंत्रन का देत नाही हे देखील सांगितले.

Updated: Mar 12, 2023, 07:54 PM IST
Anushka-Virat ने दिलं जेवणाचं आमंत्रण, तरीही कतरिना-विकी मात्र त्यांच्यासोबत जेवले नाहीत; नेमकं काय झालं? title=

Vicky-Kat Invited neighbour Virat-Anushka For Dinner : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या दोघी आज शेजारी आहेत. लग्न झाल्यानंतर विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ हे अनुष्का आणि तिचा पती भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे (Virat Kohli) शेजारी झाले.  आता शेजारी म्हटल्यावर आपण एकमेकांना आपल्या घरी जेवायला बोलवतो. त्याप्रमाणे कतरिना आणि विकीनं देखील अनुष्का आणि विराटला त्यांच्या घरी जेवायला बोलावलं. कतरिना आणि विकीनं अनुष्का आणि विराटला जेवायला तर बोलावलं मात्र, त्यांच्यासोबत जेवले नाही. याविषयी अनुष्कानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

अनुष्कानं Grazia India ला नुकतीच मुलाखत दिली होती. त्यावेळी अनुष्कानं हा खुलासा केला आहे. कतरिना आणि विकीने तिला आणि विराटला आमंत्रित केले होते त्या विषयी सांगत अनुष्का म्हणाली, कतरिनानं जेव्हा त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले होते तेव्हा तिनं कतरिनाला सांगितलं की आम्ही 6 वाजता जेवतो आणि 9:30 वाजता झोपतो. तुमच्यासाठी आम्ही 7-7:30 वाजता जेवू पण आम्हाला लवकर निघावे लागेल. त्यावर उत्तर देत कतरिना हो म्हणाली आणि म्हणाली ठीक आहे, तुम्ही जेवाल तेव्हा मी आणि विकी तुमच्यासोबत नाष्ता करू. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे अनुष्कानं हे देखील सांगितलं की तिला शाहरुख आणि कतरिना कशा प्रकारे तिचा आदर करतात. शाहरुख, कतरिना आणि अनुष्कानं 2012 साली प्रदर्शित झालेल्या जब तक है जान आणि 2018 साली प्रदर्शित झालेल्या झिरोया दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. याविषयी सांगत अनुष्का म्हणाली, तिला गोंगाट आणि खूप लाऊड अशा पार्ट्या आवडत नाही. गर्दी असेल तेव्हा तिला कसं तरी वाटू लागतं या विषयी शाहरुख आणि कतरिनाला माहित आहे त्यामुळे ते मला कधीच त्यांच्या अशा पार्ट्यांसाठी आमंत्रित करत नाहीत. मी जशी आहे तसं त्यांनी मला स्वीकारले आहे. त्यामुळे ते दोघं मला या सोशल ऑकवर्डनेसपासून वाचवण्यासाठी जे करतात ते कोणीही करू शकत नाही. 

हेही वाचा : 150 वर्ष जुन्या 'ही' Golden Haveli का आहे चर्चेत? परदेशी पाहुण्यांनी लागले वेड

अनुष्काच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या कला Qala या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती घोडे पे सवार या गाण्यात दिसली होती. लवकरच अनुष्का 'छकडा एक्सप्रेस' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारतील महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारीत आहे