Vidya Balanने करण जोहरला सांगितले तिचे बेडरुम सीक्रेट

विद्या तिच्या अभिनयामुळे कायम चर्चेत असते, पण आता विद्या तिच्या खासगी आयुष्मामुळे चर्चेत आली आहे.   

Updated: Apr 30, 2021, 03:56 PM IST
Vidya Balanने करण जोहरला सांगितले तिचे बेडरुम सीक्रेट

मुंबई :  कहानी (Kahani), पा (Paa) आणि शकुंतला देवी (Shakuntala Devi)या चित्रपटांच्या माध्यमातून अभिनेत्री विद्या बालनने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विद्याच्या वाटेला हे यश सहजा-सहजी लागलं नाही. यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. चित्रपटात प्रत्येक भूमिकेला तिने योग्य न्याय दिलं. विद्या तिच्या अभिनयामुळे कायम चर्चेत असते, पण आता विद्या तिच्या खासगी आयुष्मामुळे चर्चेत आली आहे. 

विद्याने दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये तिच्या बेडरुमधील सीक्रेट सांगितले. करणच्या शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हाजेरी लावली. करणच्या शोमध्ये कलाकार हे त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच खासगी आयुष्यामधील अनेक गोष्टींचा खुलासा करताता. शोमध्ये विद्या बालनला देखील करणने तिच्या खासगी आयुष्याबद्दल विचारलं. 

शो दरम्यान करणने विद्याला बेडरूममधील लाईट्स चालू ठेवायला आवडतात की बंद? असा प्रश्न विचारला. त्यावर विद्या म्हणाली, मला बेडरूममध्ये अंधुक प्रकाश आवडतो. त्यानंतर तुला बेडरुमध्ये गाणी लावणं किंवा मेणबत्ती लावायला आवडते का? असा प्रश्न करणने विचारला. 

त्यावर विद्या म्हणाली, 'मला बेडरूममध्ये दोन्ही आवडतं. शिवाय मला कॉटनची बेडशीट आवडते.'   त्यानंतर करणने विचारलं तुला बेडवर पडल्यानंतर काय आवडतं? चॉकलेट की ग्रीन टी?? या प्रश्नावर उत्तर देताना विद्या म्हणाली मला पाणी हवं असतं.