"मनोरंजनाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न...", कुटुंबासोबत Lust Stories 2 पाहण्याचा सल्ला देणाऱ्या विजय वर्मावर नेटकरी संतप्त

Vijay Varma on Lust Stories 2 : विजय वर्मा हा लवकरच तमन्ना भाटियासोबत 'लस्ट स्टोरी 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्यांचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. हे बोल्ड सीन्स फास्ट फॉर्वड आणि म्यूट न करता कुटुंबासोबत पॉपकॉर्न घेऊन पाहा असा सल्ला विजय वर्मानं दिल्यानंतर नेटकरी त्याच्यावर संतापले आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 26, 2023, 11:20 AM IST
"मनोरंजनाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न...", कुटुंबासोबत Lust Stories 2 पाहण्याचा सल्ला देणाऱ्या  विजय वर्मावर नेटकरी संतप्त title=
(Photo Credit : Social Media/ Movie Still)

Vijay Varma : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया हे दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्या दोघांनी रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले. आता ते दोघंही 'लस्ट स्टोरिज 2' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या मालिकेत ते दोघंही बोल्ड अंदाजात दिसणार आहेत. तर याच चित्रपटात तमन्नानं आजवरची म्हणजेच तब्बल 18 वर्षे जुनी नो- किसिंग पॉलिसी संपवली. तमन्नानं या चित्रपटात विजय वर्मासोबत रोमॅंटिक सीन दिला आहे. 

नेटफ्लिक्स आणि विजय वर्मानं इन्स्टाग्रामवर कोलॅब केलं आहे. या व्हिडीओत विजय वर्मा प्रेक्षकांना इंटीमेट सीन फास्ट फॉरवर्ड न करता कुटुंबासोबत पाहण्याचा सल्ला देत आहे. तर हे इंटीमेट सीन फक्त फास्ट फॉर्वड नाही तर न घाबरता किंवा न लाजता कुटुंबासोबत पाहण्याचा सल्ला देताना दिसत आहे. विजय वर्मा म्हणाला, “यामधील इंटिमेट सीन फॉरवर्ड करण्यापेक्षा तुमच्या कुटुंबाबरोबर एकत्र पाहा. रोमॅंटिक सीन फास्ट फॉरवर्ड करण्याची गरज काय? घाबरून किंवा लाज न बाळगता कुटुंबासोबत हा चित्रपट नक्कीच पहा. तुमचे आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू अगदी सगळ्यांबरोबर बसून पॉपकॉर्नसह या चित्रपटाचा आनंद घ्या.”

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विजय वर्मानं कुटुंबासोबत हा चित्रपटा पाहण्याचा सल्ला दिल्याचे पाहता नेटकरी संतापले आहेत. नेटकऱ्यांनं विजय वर्माला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. विजयच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्याला ट्रोल करत म्हणाले "हा भारत आहे. इथे लाज फक्त दाखवत नाहीत, तर लोकांना खरंच लाज वाटतं. काळाप्रमाणे पुढे जाणे याचा अर्थ आपल्या संस्कृतीला आणि मोठ्यांच्या प्रती असलेला सन्मान विसरणे असा नाही. तुम्ही आणि तुमच्या  टीमनं आपल्या आई-वडील आणि कुटुंबातील मोठ्यांसमोबत इंटीमेच सीन पाहतानाचा रील शेअर करायला हवा. त्यानंतर इतरांना सांगायला हवं." दुसरा नेटकरी म्हणाला, “अशा घाणेरड्या सीरिज का बनवता? मनोरंजनाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न बनवून पैसा कमावणे अत्यंत चुकीचे आहे.” तर तिसरा नेटकरी म्हणाला, "हे लोक आम्हाला घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा प्लॅन करत आहेत."

हेही वाचा : "मुलीला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहिल्या पत्नीच्या पार्थिवाला खांदा दिला...", सांगतानाच Rajpal Yadav भावूक

दरम्यान, ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर याआधी 2018 साली प्रदर्शित झालेल्या, ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटाला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता त्याचा हा दुसरा भाग आला आहे. ‘लस्ट स्टोरीज 2’ 29 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच तमन्ना आणि विजय व्यतिरिक्त नीना गुप्ता, काजोल, मृणाल ठाकूर, अंगद बेदी, कुमुद मिश्री, अमृता सुभाष हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.