close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

थेट आफ्रिकेत जाऊन हिंदी भाषा शिकवतेय 'ही' अभिनेत्री

मुख्य म्हणजे तिथे जाऊन तिने.... 

Updated: Sep 20, 2019, 08:54 AM IST
थेट आफ्रिकेत जाऊन हिंदी भाषा शिकवतेय 'ही' अभिनेत्री
थेट आफ्रिकेत जाऊन हिंदी भाषा शिकवतेय 'ही' अभिनेत्री

मुंबई : चित्रपट, चित्रीकरण आणि विविध कार्यक्रम या साऱ्यातून वेळ काढून कलाकार कायमच काही नव्या ठिकाणांना भेट देतात. कामाच्या व्यापातून उसंत मिळताच अशीच एक अभिनेत्री नुकतीच आफ्रिकेच्या सफरीवर जाऊन आली. मुख्य म्हणजे तिथे जाऊन तिने स्थानिकांना हिंदी भाषा शिकवली. तर, त्यांच्या भाषेचे धडे या अभिनेत्रीने गिरवले. तिच्या या सुट्टीवरील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. अर्थात ते व्हायरल होण्यामागची कारणंही तशीच होती. 

इतके संकेत मिळाल्यानंतर ही अभिनेत्री कोण, याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. तर, ही अभिनेत्री आहे आलिया भट्ट. अभिनय, निर्मिती या क्षेत्रांमध्ये उडी मारणारी आलिया आता चक्क एक युट्यूब व्लॉगरही झाली आहे. स्वत:च्या युट्यूब चॅनलवर ती बेरच व्हिडिओसुद्धा पोस्ट करत असते. सध्या आलियाने तिच्या आफ्रिकेतील सुट्ट्यांचा एक व्लॉग सर्वांच्या भेटीला आणला आहे. 

आफ्रिकेच्या जंगलामध्ये कापडी तंबूत राहण्यापासून स्थानिकांसोबत न्याहारी करण्यापर्यंतचे काही सुरेख क्षण तिच्या या व्लॉगमध्ये पाहायला मिळत आहेत. आलिया या व्हिडिओमध्ये एका जंगल सफारीवर असल्याचं दिसत आहे. जेथे तिने स्थानिक भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. आलियाचे हे प्रयत्न पाहता ती एक चांगली विद्यार्थी आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

इतक्यावरच न थांबता आपल्यासोबत असणाऱ्या आफ्रिकन मंडळींना ती चक्क हिंदी भाषा शिकवतानाही दिसत आहे. आफ्रिकेत जाऊन स्थानिकांना नमस्ते... म्हणायला शिकवणाऱ्या आलियाचा हा व्हिडिओ सध्या युट्यूब वर्तुळात चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळ आफ्रिकन सफारीवर जाण्याच्या बेतात असाल तर आलियाचा हा व्लॉग पाहाच. शिवाय तिथे जाण्याची संधी काही केल्या मिळाली नाही, तरीही आलियाच्या या व्लॉगमधून तुम्हाला सफारी नक्कीर घडेल.