...म्हणून बिग बींसमोर अभिषेकला सेटवरून दिलं होतं हाकलवून

Amitabha - Abhishek Bachchan : जेव्हा अभिषेक बच्चनला अमिताभ बच्चन यांच्यासमोरून सेटवरून हाकलवून लावण्यात आले होते. अभिषेकनंच सांगितला तो किस्सा

दिक्षा पाटील | Updated: Sep 9, 2023, 12:04 PM IST
...म्हणून बिग बींसमोर अभिषेकला सेटवरून दिलं होतं हाकलवून title=
(Photo Credit : Social Media)

Amitabha - Abhishek Bachchan : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि लोकप्रिय अभिनेता अभिषेक बच्चननं 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या रेफ्यूजी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अभिषेकनं जवळपास 23 वर्षे अभिनय क्षेत्राला दिलीत. या काळात अभिषेकनं अनेक हिट, सेमी हिट आणि सुपरडिट चित्रपट दिले. त्याचे जास्त चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेत. इतक्या मोठ्या स्टारचा मुलगा असलेल्या अभिषेकला एकदा बिग बींच्या सेटवरून हकलवले होते. अभिषेक बच्चननं स्वत: हा खुलासा केला होता. 

अभिषेक बच्चननं एका मुलाखतीत सांगितले होते की त्याच्यासोबत त्याच्या मित्रांना देखील शिक्षा भोगावी लागली होती. अभिषेक 6-7 वर्षांचा होता तेव्हा असं घडलं होतं. त्यावेळी तो बिग बींसोबत चित्रपटाच्या सेटवर गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा जवळचा मित्र गोल्डी बहल देखील होता. अभिषेकनं याविषयी सांगितलं की 'आम्ही तेव्हा 5-6 वर्षांचे होतो. त्यावेळी खोटी तलवार पाहून आम्ही उत्सुक झालो. रिपोर्ट्सनुसार, अभिषेक म्हणाला होता की गोव्यात चित्रपटाचा क्लायमेक्स सीन शूट करत असताना खोटी तलवार आम्हाला मिळाली आणि आम्ही त्यासोबत खेळू लागलो. खेळता-खेळता तलवार तुटली आणि त्यानंतर आम्हाला लगेच क्रुच्या हॉटेलमध्ये हाकलवून लावलं.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

1983 साली प्रदर्शित झालेल्या रमेश बहल यांनी दिग्दर्शित केलेला 'पुकार' या चित्रपटाच्या सेटवरचा हा किस्सा आहे. त्या चित्रपटात अमिताभ महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटात अमिताभ यांच्याशिवाय जीनत अमान, रणधीर कपूर, टीना मुनीम यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट त्या वर्षी सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता. तर प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली होती. 

हेही वाचा : एका दिवसात उतरली 'जवान'ची क्रेझ? कमाईत दुसऱ्याच दिवशी मोठी घट

गोल्डी बहल यांच्याविषयी बोलायचे झाले तर ते रमेश बहल यांचे पुत्र आहेत. आज गोल्डी देखील त्याच्या वडिलांप्रमाणे दिग्दर्शन करतो. असं म्हटलं जातं की या प्रसंगानंतर जवळपास 19 वर्षांनी 2001 मध्ये 'बस इतना सा ख्वाब है' या चित्रपटासाठी अभिषेक आणि गोल्डी यांनी एकत्र काम केले. या चित्रपटातून गोल्डी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अभिषेकसोबत रानी मुखर्जी आणि सुष्मिता सेन महत्त्वाच्या भूमिकेत होती.