इच्छा असतानाही रेखा यांना १५०० रुपयांचा हार देवू शकले नव्हते अमिताभ बच्चन

 चाहत्यांना रेखा आणि अमिताभ यांची जोडी एकत्र पाहायची आहे.

Updated: Jan 26, 2022, 07:16 PM IST
इच्छा असतानाही रेखा यांना १५०० रुपयांचा हार देवू शकले नव्हते अमिताभ बच्चन title=

मुंबई : अमिताभ बच्चन आणि रेखा खूप दिवसांपासून चित्रपटांमध्ये एकत्र दिसले नसतीलही,  मात्र आजही ही जोडी  खूप चर्चेत असते. अमिताभ आणि रेखा यांचं नावं वेगळं झाल्यानंतरही सोशल मीडियावर एकमेकांशी यांच नाव अनेकदा जोडलेलं दिसतं. त्यांच्याबद्दल अनेक किस्सेही चर्चेत असतात.

असाच एक किस्सा म्हणजे रेखा यांना 1500 रुपये किमतीचा हार आवडला, पण अमिताभ बच्चन यांची इच्छा असतानाही त्यांना तो हार विकत घेता आला नाही. आता जर तुम्ही यावर जास्त विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा किस्सा खरा नसून अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या सुपरहिट चित्रपटाचा हा सुपरहिट सीन आहे.

1976 मध्ये अमिताभ आणि रेखा यांनी 'दो अंजाने' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोकांना चित्रपट आणि त्यांची जोडी प्रचंड आवडली होती. आणि या चित्रपटातलाच  एक सीन होता. ज्यात रेखा अमिताभ यांच्याकडे नेकलेसची ईच्छा व्यक्त करते. तेव्हा अमिताभ त्या नेकलेसची किंमत जाणून घेण्यासाठी त्या दुकानात जातात. तेव्हा नेकलेस किंमत ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते.

या चित्रपटात अमिताभ एका मध्यमवर्गीय व्यक्तीच्या भूमिकेत होते. या नेकलेसची किंमत 1500 रुपये होती. त्याचवेळी अमिताभ यांना हा हार खरेदी करता आला नाही, यानंतर रेखा यांचा चेहरा उतरला होता. अमिताभ बच्चन आणि रेखा हे दोघंही या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसले आणि त्यानंतर त्यांनी एकामागोमाग एक 8 चित्रपट एकत्र दिले.

हळूहळू दोघांची जवळीकता वाढत गेली आणि त्यांच्या लव्हस्टोरीच्या बातम्या सगळीकडे पसरू लागल्या. पण 1981 मध्ये आलेला सिलसिला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही. गेल्या अनेक दशकांपासून चाहत्यांना रेखा आणि अमिताभ यांची जोडी एकत्र पाहायची आहे. मात्र आतापर्यंत ते कोणत्याही प्रोजेक्टमध्ये एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसले नाहीत.