Shahrukh की गौरी? दोघांमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण, पाहून विश्वासच बसणार नाही

जाणून घ्या, कोण आहे श्रीमंत पती की पत्नी...

Updated: Oct 8, 2022, 12:48 PM IST
Shahrukh की गौरी? दोघांमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण, पाहून विश्वासच बसणार नाही title=

मुंबई : बॉलिवूडमधील पावर कपल म्हणून बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान (Shahrukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांच्या जोडीकडे पाहिलं जात. आज गौरीचा 52 (Gauri Khan's Birthday) वा वाढदिवस आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने या दोघांमध्ये श्रीमंत कोण आहे ते जाणून घेऊया. 

बातमीची लिंक : MMS व्हायरल झाला अन् दुसऱ्याच दिवशी..., मोना सिंगनं केलं 'हे' काम

गौरीचा जन्म 8 ऑक्टोबर 1970 साली दिल्लीतील पंजाबी कुटुंबात झाला. गौरीने तिचे शिक्षण लॉरेटो कॉन्व्हेंट शाळेत पूर्ण केले आणि नंतर तिने दिल्लीतच फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. शाहरुख आणि गौरीने 8 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, 1991 मध्ये लग्न केले. ते दोघेही ग्लॅमर आणि लग्झरीयस आयुष्य जगतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'जिसने भी उसे छोड़ा...', दयाबेन पुन्हा मालिकेत परतणार नाही? एका बड्या व्यक्तीच्या पोस्टनं चर्चांना उधाण

शाहरूख हा बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तर दुसरीकडे त्याची पत्नी ही देशातली नावाजलेल्या इंटेरिअर डिझायनर्स पैकी एक आहे. गौरीने मुकेश अंबानी, रॉबर्टो कावल्ली आणि राल्फ लॉरेन सारख्या अनेक दिग्गजांच्या घराचे किंवा ऑफिसचे इंटेरिअर केले आहे. 

आणखी वाचा : 'त्यानं मला हॉटेलच्या रूममध्ये...', अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा 'तो' धक्कादायक अनुभव

गौरीचे स्वत:चे रेड चिलीज एन्टरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस आहे. 2018 मध्ये गौरीचं नाव फॉरच्युन मॅगझिनच्या 50 मोस्ट पावरफुल वुमनच्या यादीत नाव होत. गौरीने रेड चीली या तिच्या प्रोडक्शन हाऊसमधून ‘मैं हूं ना’, ‘ओम शांति ओम’, ‘माय नेम इज खान’, ‘हैप्पी न्यू ईयर’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाचे प्रोडक्शन केले आहे. (Who Is Reach Between Shahrukh Khan and Gauri Khan Know More) 

आणखी वाचा : 'सजना है मुझे' म्हणत अंजली अरोरानं शेअर केला 'हा' बोल्ड व्हिडीओ

कोईमोईने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूखची एकुण संपत्ती ही 5100 कोटी आहे, तर गौरीची एकुण संपत्ती 1600 कोटी आहे. शाहरूखचे मुंबईत असलेले घर मन्नत हे 26, 328 स्क्वेअर फिटचे आहे. दुबईत देखील त्याचा एक व्हिला आहे.

आणखी वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रावणाच्या 'त्या' लूकवर राऊतांनी दिली अशी प्रतिक्रिया

एवढंच नव्हे तर शाहरूखकडे लंडनमध्ये देखील एक घर आहे. त्या घराची किंमत ही 172 कोटी आहे. तर आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स ही टीम शाहरूख आणि जूही चावलाची आहे.