युसूफ हुसैन यांचं निधन, हंसल मेहताकडून भावनिक पोस्ट शेअर

अभिनेते युसूफ हुसेन यांचे निधन झाले आहे. 

Updated: Oct 30, 2021, 09:29 AM IST
युसूफ हुसैन यांचं निधन, हंसल मेहताकडून भावनिक पोस्ट शेअर title=

मुंबई : अभिनेते युसूफ हुसेन यांचे निधन झाले आहे. बॉलीवूड आणि टीव्हीचा प्रसिद्ध चेहरा युसूफ हुसैन यांच्या निधनाची माहिती देताना दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. निर्माता आणि अभिनेता युसूफ हुसैन यांच्या निधनाने हंसल मेहता यांना मोठा धक्का बसला आहे. जड अंतःकरणाने माहिती देताना त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'मी आज खरोखरच अनाथ झालो आहे. आता आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही.

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी  पोस्टमध्ये  युसूफ हुसैन यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले - 'मी 'शाहिद'चे 2 शेड्युल पूर्ण केले होते आणि आम्ही अडचणीत होतो. मी खूप अडचणीत होतो. माझी फिल्ममेकर म्हणून कारकीर्द संपणार होती. तेवढ्यात ते म्हणाला माझ्याकडे फिक्स डिपॉझिट आहे, जर ते पैसे तुमच्या अडचणीत कामी आले नाहीत तर माझ्याही ते पैसे काही उपयोगाचे नाहीत.

हंसल मेहता पुढे लिहिले की, 'त्यांनी चेकवर सही केली आणि 'शाहिद' पूर्ण झाला. केवळ माझे सासरेच नाही तर तुम्ही माझ्या वडिलांसारखे होता. आज ते आमच्यात नाहीत. एवढंच नाही तर हंसल मेहता यांनी युसूफ हुसेन यांचे आभार मानले आणि तुमच्या शिवाय मी आता आनाथ झालो... असं देखील ते म्हणाले.