Almond Peel Benefits: बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्री बदाम भिजत ठेवून ते सकाळी खाल्ल्याने शरीराला खूप लाभ मिळतात. मात्र, हे भिजवलेले बदाम खाताना बदामाची सालं काढून टाकली जातात. पण तुम्हाला माहितीये का बदामाइतकीच त्याच्या सालीतही खूप पौष्टिक तत्वे आढळतात. बदाम हे आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यास फायदेशीर ठरते. केस, त्वचा, मेंदू तल्लख करणे यासारखे अनेक गुण आढळतात. पण त्याचबरोबर बदामाच्या सालांमध्येही खूप गुणकारी तत्वे आढळतात.
बदामाप्रमाणेच त्यांच्या सालांमधूनही खूप पोषण मिळतं. या सालांमध्ये व्हिटॅमिन,मिनरल, अँटीऑक्सीडेंट यासारखे गुणधर्म असतात. जे त्वचा, केस यासाठी खूप फायदेशीर ठरतात. या व्यतिरिक्तही बदामाच्या सालांमध्ये गुणधर्म आढळतात जे तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, सालींसकट बदाम खाणे खूप फायदेशीर आहे कारण यात पौष्टिक तत्व आढळतात. म्हणूनच बदाम सालांसोबत खाण्याअगोदर ते नेहमी भिजवण्याचा सल्ला दिला जोता. कारण कधी तरी बदामाच्या सालीमध्ये फायटिक अॅसिड नावाचे रसायन आढळते जे आरोग्यासाठी हानिकारक असते.
बदामाच्या सालात फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. जे आतड्यातील चांगले बॅक्टिरिया वाढवते तसंच, यात फ्लेवोनोइड्सदेखील असतात. बदामाच्या साली अळशी, भोपळ्याच्या बिया यांच्यासोबत गरम दूधातून सेवन करावे. यामुळं बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते.
तुम्ही बदामाच्या सालींपासून हेअरमास्कदेखील बनवू शकता. त्यासाठी 1/2 कप बदामाची साली, यात 1 अंड, 1 मोठा चमचा नारळाचे तेल, 2 मोठे चमचे कोरफडीचे जेल आणि मध यांचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण गाळणीने गाळूण केसांना लावा. घरच्या घरी हेअरस्पा तुम्ही करु शकता. यात व्हिटॅमिन ईचे खूप गुण असतात.
1 कप बदामाची साली चांगल्या धुवून घ्या नंतर उन्हात सुकवून ठेवा. त्यानंतर एक वाटी घेऊन त्यात मोठा चमचा जवसाचे तेल, 1 चमचा लसणाची पावडर, 1 चमचा कांदा पावडर, 1/2 चमचा काळी मिरी पावडर, मीठ टाकून सगळे नीट एकजीव करा. आता यात बदामाच्या सुकवलेल्या साली टाका. आता 5-10 मिनिटांसाठी बेक करुन घ्या कुरकुरीत झाल्यानंतर ते एका डब्यात भरुन ठेवून द्या.