तुम्ही टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये आहात? हे आहेत टॉक्सिक रिलेशनीपचे ५ संकेत

प्रत्येकाची  रिलेशनशीप सारखी नसते. 

Updated: Apr 25, 2021, 04:04 PM IST
तुम्ही टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये आहात? हे आहेत टॉक्सिक रिलेशनीपचे ५ संकेत title=

मुंबई : प्रत्येकाची  रिलेशनशीप सारखी नसते. शिवाय आपण देखील त्याच्यासारखचं आपल्यालाही हवं आहे, अशी भावना मनात  ठेवली तर नात्यात दुरावा निर्माण होतो. काही वेळा आपण चूकीच्या व्यक्तीच्या प्रेमात अंधळे होतो. त्यानंतर ते नातं ओझं वाटू लागतं. अशा परिस्थितीत नातं टिकवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्ही समोरच्यावर जीवापाड प्रेम करता पण समोरच्याला तुमच्या भावनांची काहीचं किंमत नसते. अशा रिलेशनशीपला टॉक्सिक (Toxic Relationship) म्हणतात.

प्रत्येत नात्यात पाठिंबा असणं फार महत्त्वाचं असतं. शिवाय एकमेकांच्या मदतीला धावून जाणं, ही एका चांगल्या नात्याची ओळख आहे. त्यामुळे नातं अधिक घट्ट होतं. असं असल्यास तुम्हाला मिळाल्या यशाचा सर्वात जास्त आनंद तुमच्या पार्टनरला होतो. शिवाय हे यश फक्त त्या एकट्याचं नसून दोघांचं असतं. ही गोष्ट कायम लक्षात राहिली पाहिजे. 

तर काही नात्यामध्ये जोडीदार असा असतो ज्याला समोरच्याचं यश पाहून आनंद होत नाही. चांगल्या किंवा साध्या गोष्टींमध्ये देखील एकमेकांची चूक काढल्यासं ते नाते फार काळ टिकूचं शकत नाही. अशा रिलेशनशीपला टॉक्सिक... म्हणतात. त्यामुळे असे विचार बदलले तर नात्यात गोडवा नक्कीच निर्माण होईल. 

काही व्यक्ती असे असतात ज्यांना वाटतं की आपला जोडीदार आपल्या नियंत्रणार राहायला हवा. पण हे असं वागणं अत्यंत चूकीचं आहे. कामय समोरच्यावर आपला अधिकार गाजवणं. नात्यात एक गोष्ट कायम लक्षाच ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्या जोडीदाराला देखील मन आणि भावना आहेत. 
 
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांबाद्दल आदर. ज्या व्यक्ती आपल्या पार्टनवर अधिकार गाजवतात त्यांना मुळात आदर या शब्दाचा अर्थचं माहित नसतो. तो फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी एक साधा छोटा शब्द असतो. जोडीदाराचा आदर ठेवला नाही तर नात्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. 

जर तुमचा पार्टनरचा स्वभाव चांगला नसेल तर तो कायम आर्थिक व्यवहारात गडबड करेल. तुमचा पैसा पाण्यासारखा  खर्च करेल. जेव्हा तुम्ही लिव-इनमध्ये असाल तर अशा अडचणी तु्म्हाला कायम फेस कराव्या लागतील.